द्राक्षांमुळे बोरीचे नाव जगाच्या पाठीवर प्रसिद्ध - अजित पवार 

राजकुमार थोरात
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

वालचंदनगर (पुणे) : बोरी गावातील दर्जेदार द्राक्षे आज जगाच्या पाठीवर सगळीकडे निर्यात होत असून बोरीचे नाव जगाच्या पाठीवर प्रसिद्ध असल्याचे गौरवोद्गार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. बोरी (ता. इंदापूर) येथे अजित पवार यांच्या हस्ते आठवडे बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. 

कार्यक्रमास आमदार दत्तात्रेय भरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, उपसभापती यशवंत माने, झेडपीच्या आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषद सदस्य वैशाली पाटील, पंचायत समिती सदस्य सारिका लोंढे, माजी झेडपी सदस्य प्रतापराव पाटील, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, अशोक पाटील, ज्ञानेश्‍वर जोरी, रामभाऊ जोरी, बोरीचे सरपंच संदीप शिंदे, उपसरपंच भारती संतोष भिटे, कळसचे सरपंच गणेश सांगळे, पांडुरंग वाघमोडे, शशिकांत शिंदे उपस्थित होते. 

यावेळी पवार यांनी सांगितले की, काही वर्षापूर्वी आम्ही बोरीमध्ये कडबा खरेदी करण्यासाठी येत होतो. आज बोरीची प्रगती झाली आहे. बोरीचे दर्जेदार द्राक्षे जगाच्या पाठीवर प्रसिद्ध आहेत. येथील शेतकरी कष्टाळू असून शेतकऱ्यांनी दगडधोंडे फोडून माळरानावरती द्राक्षांच्या बागा फुलविल्या आहेत. शेततळ्यामुळे बोरी गावचे चित्र पालटले असून बोरीकरांचे पवार यांनी कौतुक केले. यावेळी पवार यांच्या हस्ते आठवडे बाजाराचा नव्याने शुभारंभ करण्यात आला. यावेळी आठवडे बाजारामधील व्यापऱ्यांचा पवार यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. अनोख्या सत्कारामुळे बाजारामध्ये आलेले शेतकरी व व्यापारी ही भारवले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखेचा ही शुभारंभ ही पवार यांच्या हस्ते कण्यात आला.

Web Title: Marathi news pune news grapes bori village