सांगवीत स्त्री शक्तीचा जागर परिवर्तन दुचाकी रॅलीने नववर्षाचे स्वागत 

रमेश मोरे
रविवार, 18 मार्च 2018

जुनी सांगवी शितोळेनगर येथुन रॅलीस सुरूवात करण्यात आली. या परिवर्तन रॅलीत
लेक वाचवा लेक शिकवा, नेत्रदान, रक्तदान अवयव दान श्रेष्ठदान, प्लॅस्टिकची घडण गाईगुरांचे मरण, विज्ञानावर ठेवू श्रद्धा- दूर करू अंधश्रद्धा, पाणी हे जीवन आहे त्याचा वापर जपून करूया अशा घोषणा देत महिलांनी नववर्षाचे स्वागत केले.रँलीस महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

जुनी सांगवी : हिंदु नववर्षाच्या पुर्वसंध्येला ओम नमो: परिवर्तन परिवाराच्या वतीने सांगवी परिसरात भगवे फेटे परिधान करून सांगवी परिसरात दुचाकी रॅली काढण्यात आली.

पारंपारिक रूढी, परंपरा आणि सर्व सोपस्कार आधुनिक युगात देखील वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा किती महत्वाच्या आहेत. म्हणूनच आधुनिकते बरोबरच परंपरेची कास धरून, संस्काराची शिदोरी प्रत्येक कुटुंबात आणि त्याबरोबरच संपूर्ण समाजात रुजवण्यासाठी मराठी नवीन वर्षाचे औचित्य साधून नवीन वर्षाच्या पूर्व संधेला समाज परिवर्तनाची व आरोग्यवर्धनाची गुढी उभारण्यासाठी ओम नमो: परिवारातर्फे महिलांनी, महिलांसाठी 
ओम नमो: परिवर्तन रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे रॅलीच्या मुख्य प्रवर्तक डॉ. वैशाली लोढा यांनी सांगितले.

जुनी सांगवी शितोळेनगर येथुन रॅलीस सुरूवात करण्यात आली. या परिवर्तन रॅलीत
लेक वाचवा लेक शिकवा, नेत्रदान, रक्तदान अवयव दान श्रेष्ठदान, प्लॅस्टिकची घडण गाईगुरांचे मरण, विज्ञानावर ठेवू श्रद्धा- दूर करू अंधश्रद्धा, पाणी हे जीवन आहे त्याचा वापर जपून करूया अशा घोषणा देत महिलांनी नववर्षाचे स्वागत केले.रँलीस महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

श्री गजानन मंदिर - शितोळे चौकातुन बँक ऑफ महाराष्ट्र, पाण्याची टाकी साई चौक, फेमस चौक, क्रांती चौक, कृष्णा चौक मार्गावरून काटेपुरम चौक - पिंपळेगुरव - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दुचाकी रॅलीची सांगता करण्यात आली. डॉ. वैशाली लोढा, सोनल मुसळे, मंजू होनराव, स्वाती खारुळ, मिनाक्षी जगताप, धनश्री दळवी, मेघा भिवापुरकर, सुनीता जाधव, कविता कामथे, लिना वैगुन्ट्टीवर, सुवर्णा पाटकर आणि ओम नमो: परिवारातील सर्व सदस्यांनी केले. तर येथील शिवरत्न शंभू राजे वेलफेअर ट्रस्ट यांनी रॅली यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. 

Web Title: Marathi news Pune news gudhi padwa rally

टॅग्स