नक्षीदार गाठ्यांचा बाजारपेठेत गोडवा (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

पुणे - चुलीवर साखरेचा पाक उकळायचा... त्यात लिंबू पिळायचे... रंगविण्यासाठी इन्सेन्स वापरायचा... पाकाला एक तार आली की नक्षीकाम केलेल्या लाकडाच्या साच्यात (गटात) तो ओतायचा... अवघ्या पंधरा-वीस मिनिटांत गाठी तयार. लाकडी पट्ट्यांमध्ये दोरा ओवून त्यावर पदके घट्ट बसल्याने सात, नऊ, अकरा पदरी गाठीची माळ तयार होते. हीच साखर गाठ गुढीपाडव्याला गोडवा घेऊन येते. म्हणूनच ब्रह्मध्वजाला (गुढीला) आपण आनंदाने साखरेची गाठ अर्पण करतो.

नक्षीकामातल्या गाठ्या...
 ग्राहकांच्या मागणीनुसार खास नक्षीकामातल्या गाठ्या तयार
 पदकावर आरसा, कुंदन, टिकल्या, स्वस्तिक, ओंकार, कलश आदी शुभचिन्हे
 विविध देवस्थानांकडूनही मोठ्या पदकांच्या गाठ्यांची मागणी
 २५ ग्रॅम ते पाच किलोपर्यंतच्या गाठ्या मागणीनुसार तयार
 गाठ्यांची किंमत दहा ते पंधराशे रुपयांपर्यंत

मुहूर्त गुढीपाडव्याचा...
चैत्रशुद्ध प्रतिपदा (रविवार, ता. १८) अर्थात साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस.
देवांच्या मूर्तीस, गुढीला अर्पण करण्यासाठी साखरेच्या गाठीला विशेष महत्त्व.

वसंतपंचमीच्या मुहूर्तावर आम्ही गाठ्या तयार करतो. सुरवातीच्या गाठ्या देवस्थानांना पाठवितो. शिवरात्रीपासून मोठ्या प्रमाणात गाठ्या तयार करायला सुरवात होते. आमच्याकडे पिढ्यान्‌ पिढ्यांचे लाकडी साचे आहेत. त्यावर उत्कृष्ट नक्षीकामही केलेले आहे. तयार गाठी महिनाभर टिकते.
- महेश ढेंबे, गुडदाणी व्यावसायिक

Web Title: marathi news pune news gudipadwa sakhargath

टॅग्स