हडपसरमध्ये गाडीतळ उड्डाणपूलावर टेम्पोला आग

संदिप जगदाळे
बुधवार, 24 जानेवारी 2018

हडपसर : अचानक टेम्पोला आग लागल्याने तो जळून खाक झाला. ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गाडीतळ उड्डाणपूलावर घडली. त्यामुळे या मार्गावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. हडपसर आग्नीशामक केंद्राच्या बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली.

छोटा हत्ती टेम्पो पंधरा नंबरहून वैदूवाडी येथे एसी रिपेरिंगचे साहित्य घेवून जात होता. अचानक इंजीनमध्ये धूर येवू लागला. चालक शिवाजी अर्जून शिसराट (वय २८) यांनी टेम्पोतील साहित्य बाजूला फेकले. दरम्यान पूर्ण टेम्पो आगीत जळून खाक झाला. दरम्यान आग्नीशाक बंबने आग विझवली. त्यानंतर इतर वाहनांच्या सहाय्याने टेम्पो हडपसर पोलिस ठाण्यात नेला. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. 

Web Title: Marathi news pune news hadapsar fire in tempo