हडपसर साहित्य संस्कृती मंडळातर्फे पत्रलेखन स्पर्धा

कृष्णकांत कोबल
रविवार, 21 जानेवारी 2018

चार गटांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. सुमारे 135 स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते. पाचवी ते सातवी या गटातील विद्यार्थ्यांना गावची जत्रा व मला आवडलेले पुस्तक, 8 वी ते 10 वी या गटासाठी आपल्या जीवनातील मोबाईलचे महत्व व आपल्या देशातील विज्ञानातील गगनभरारी, महाविद्यालयीन गटासाठी 'जात' माझा दृष्टीकोन व मतदानाचे महत्व तर खुल्या गटासाठी दैदिप्यमान यश प्राप्त केलेल्या पाल्यास पत्र व समाज सेवेची सुरूवात घरातून आदी विषयांवर सहभागीं स्पर्धकांनी आपल्या प्रिय व्यक्तिस पत्रलेखन केले.

मांजरी : संपर्क व दळणवळणाच्या साधनांमध्ये झालेल्या विशेष प्रगतीमुळे कार्यालयीन कामकाजाव्यतिरिक्त पत्रलेखन संस्कृतीचा झपाट्याने ऱ्हास झालेला अनुभवास येत आहे. ही पत्र संस्कृती जपली जावी, त्याबाबत नव्या पिढीमध्ये आकर्षण निर्माण व्हावे, आपल्या भावना त्यातून व्यक्त करता याव्यात यासाठी येथील 'हडपसर साहित्य संस्कृती मंडळाने' विद्यार्थी व नागरिकांसाठी पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली. लोहिया उद्यानात आयोजित केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  

चार गटांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. सुमारे 135 स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते. पाचवी ते सातवी या गटातील विद्यार्थ्यांना गावची जत्रा व मला आवडलेले पुस्तक, 8 वी ते 10 वी या गटासाठी आपल्या जीवनातील मोबाईलचे महत्व व आपल्या देशातील विज्ञानातील गगनभरारी, महाविद्यालयीन गटासाठी 'जात' माझा दृष्टीकोन व मतदानाचे महत्व तर खुल्या गटासाठी दैदिप्यमान यश प्राप्त केलेल्या पाल्यास पत्र व समाज सेवेची सुरूवात घरातून आदी विषयांवर सहभागीं स्पर्धकांनी आपल्या प्रिय व्यक्तिस पत्रलेखन केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधीर मेथेकर, महापालिकेतील गटनेते नगरसेवक चेतन तुपे, योगेश ससाणे, माजी नगरसेवक शिवाजी पवार, प्रा. विजय कुलकर्णी, साहित्यिक जयंत हापन, संतोष जगताप, विवेक ससाणे, संस्कार विश्व, सह्याद्री प्रतिष्ठान, सिध्देश्र्वर बहुउद्देशीय संस्था, अरूणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्था, शिवसमर्थ संस्था, मानवी संस्था आदींनी स्पर्धेचे संयोजन केले.

मेथेकर महणाले, की "पत्रांमधून डोकवणारे नात्यातील बंध, जिव्हाळा, गोडवा आणि दटावणी नात्यांची वीण अधिकाधिक घट्ट करणारी आहे. उत्कृष्ट साहित्य निर्मितीलाही येथे मोठा वाव होता. याशिवाय संगणक, मोबाईलच्या सहवासाने पत्रलेखन कालबाह्य किंवा दुर्लक्षित होऊ नये, यासाठी दरवर्षी अशी स्पर्धा आयोजित केली जात आहे.''

Web Title: Marathi news pune news hadapsar letter writing competition