बहुउद्देशीय कुबडीचा दिव्यांगांना आधार

संतोष आटोळे
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

पुण्यातील बावधन मध्ये नुकतेच इन्स्पायर अवॉर्ड या उपक्रमांतर्गत जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनामध्ये निमिष आटोळे विद्यालयातील विद्यार्थीनीने "बहुउद्देशीय कुबडी" हा प्रकल्प सादर केला.

शिर्सुफळ : पारवडी येथील कै .जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालय व ज्युनियर कॉलेज मधील इयत्ता सातवीची  विद्यार्थ्यीनी कुमारी निमिष बंडु आटोळे हिने बनविलेल्या ' बहुउद्देशीय कुबडी ' या प्रकल्पाची निवड राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य श्री.सखाराम गावडे सर यांनी दिली

पुण्यातील बावधन मध्ये नुकतेच इन्स्पायर अवॉर्ड या उपक्रमांतर्गत जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनामध्ये निमिष आटोळे विद्यालयातील विद्यार्थीनीने "बहुउद्देशीय कुबडी" हा प्रकल्प सादर केला. या उपकरणामध्ये अपंग व्यक्तीला अंधारातून प्रवास करण्यासाठी बॅटरीची सोय केलेली आहे, तसेच पाण्याची बाटली, मोबाईल ठेवण्याची सोय, गर्दीमध्ये हॉर्न वाजविण्याची व उन्हाळ्यामध्ये उकाडयापासून संरक्षणासाठी फॅनची सोय असून महत्वाचे वैशिष्टय म्हणजे ही कुबडी फोल्ड करुन अपंग व्यक्तिला कमोड पद्धतीने शौचालयाकरिता वापर करता येतो . 

सदर विद्यार्थीनी व मार्गदर्शन करणारे विषय शिक्षक दत्तात्रय फडतरे यांचा सत्कार विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गावडे, विद्यालयाचे प्राचार्य सखाराम गावडे, पर्यवेक्षक दिलिप पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेवटी पदाधिकारी व सर्व शिक्षक यांनी राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या .

Web Title: Marathi news Pune news handicapped people