युवा दिनानिमित्त आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराची सांगता

मिलिंद संधान
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

नवी सांगवी : जागतिक युवा दिनानिमित्त आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराची आज सांगता झाली. येथील पीडब्ल्युडी मैदानावर महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान व जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या शिबिराचा २७ हजार पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला.
 
आज सायंकाळी पार पडलेल्या समारोप प्रसंगी शिबिराचे मुख्य संयोजक आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते गरजुंना ७५ श्रवणयंत्रे, २५ जयपुर फूट व हँण्ड, १५ कँलिपर, १० व्हिलचेअरचे वाटप करण्यात आले. यावेळी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेविका माई ढोरे, झामाबाई बारणे, सविता खुळे, आशा शेंडगे, माधवी राजापुरे, नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंघोळकर उपस्थित होते. 

शिबिरात २७ हजार रुग्णांच्या मोफत तपासणी बरोबर त्यांना औषधेचेही वाटप करण्यात आले. पाच हजार चष्मेही यावेळी गरजूंना पुरविण्यात आले. १२ रुग्णांना अँन्जोग्राफीसाठी मुंबई व तळेगाव येथील खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले. तसेच ३००० हजार विद्यार्थीनींचे समुपदेशन करण्यात आले. नामदेव तळपे यांनी सूत्रसंचालन केले तर रामकृष्ण राणे यांनी आभार मानले.

Web Title: Marathi news pune news health camp on the occasion of youth day