बंद पडलेले हृदय सामान्य माणूससुद्धा चालू ठेऊ शकतो : डॉ. बाहेती

रवींद्र जगधने
मंगळवार, 23 जानेवारी 2018

सामान्य व्यक्तीसुद्धा बंद पडलेले हृदय वैद्यकीय मदत मिळेपर्यंत कसे चालू ठेवू शकतो, याचे प्रात्यक्षिक डॉ. माया भालेराव व लोकमान्य रुग्णालयाच्या डॉ. विनोदा गोंचिकर यांनी दिले. अर्धांगवायूचा झटका आल्यास पहिल्या एक ते सहा तासांत तज्ज्ञ वैद्यकीय मदत घेतल्यास येणाऱ्या अपंगत्वावर आपण मात करू शकतो, याबाबत डॉ. बाहेती यांनी सांगितले. 

पिंपरी : हृदयविकाराचा झटका किंवा अपघातात बंद पडलेले हृदय वैद्यकीय मदत मिळेपर्यंत सामान्य माणूससुद्धा चालू ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो, असे डॉ. संदीप बाहेती यांनी चिंचवड येथे सांगितले.

'महेश प्रोफेशन फोरम' व 'इंडियन सोसायटी ऑफ ऍनेस्थेशिया' शाखा पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'जीवन संजीवनी' ते बोलत होते. यावेळी संदीप भट्टड, "एनएसए'चे शहराध्यक्ष डॉ. रत्नदीप मार्केंडेय, लोकमान्य रुग्णालयाचे डॉ. श्रीकृष्ण जोशी उपस्थित होते. 

सामान्य व्यक्तीसुद्धा बंद पडलेले हृदय वैद्यकीय मदत मिळेपर्यंत कसे चालू ठेवू शकतो, याचे प्रात्यक्षिक डॉ. माया भालेराव व लोकमान्य रुग्णालयाच्या डॉ. विनोदा गोंचिकर यांनी दिले. अर्धांगवायूचा झटका आल्यास पहिल्या एक ते सहा तासांत तज्ज्ञ वैद्यकीय मदत घेतल्यास येणाऱ्या अपंगत्वावर आपण मात करू शकतो, याबाबत डॉ. बाहेती यांनी सांगितले. 

डॉ. संजीवकुमार पाटील व पंधरा डॉक्‍टरांच्या समूहाने 'भूलसम्राट' या नाटिकेद्वारे भूलतज्ज्ञांचे वैद्यकीय शास्त्रातले महत्त्व समजावून सांगितले. शस्त्रक्रियेच्या वेळी रक्तदाब कमी-जास्त झाल्यास त्यावर नियंत्रण करणे, वेळप्रसंगी हृदयाचे ठोके चुकल्यास त्यावर उपचार करणे. शस्त्रक्रियेच्या वेळी अतिप्रमाणात रक्तदाब झाल्यास रक्तदाब पडू न देणे, तसेच वेदनाविरहित प्रसूती, दुर्धर वेदनेवर उपचार असे विविध कौशल्याचे काम भूलतज्ज्ञ करत असतात.

तसेच कृत्रिम श्‍वासोच्छ्वास देण्यातही भूलतज्ज्ञ निपूण असतात. हे या प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थितांना समजले. कैलास काबरा, संदेश मणियार, संदीप नवाल, सचिन चितलंगे, रोशन लोया आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सूत्रसंचालन कैलास सोनी यांनी केले. तर अभिषेक सदानी यांनी आभार मानले. 

Web Title: Marathi news pune news off heart will start may manually