होलिकादहनातून व्यसनमुक्तीचा संदेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 मार्च 2018

कोंढवा- दारू, सिगारेट, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करून युवा पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जात असून, तरूण पिढीला समाजात उंची गाठण्यासाठी सशक्त मन आणि शरीराची गरज आहे. त्यासाठी युवा पिढी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे असे मत डॅा.मिलिंद भोई यांनी व्यक्त केले. कोंढवा बुद्रुक येथील आदित्य अॅकडमी यांनी व्यसनमुक्ती होळीचे आयोजन केले होते.त्याप्रसंगी डॅा.भोई बोलत होते.

यावेळी योगगूरू आनंत झांबरे, अॅड.मधूकर धांडेकर, तुषारभाई पारेख, गणेश सुतार, ऋषीकेश खवले, मुकुंद दरेकर, संजय कांबळे, गणेश कामठे, अंकुश घाडगे उपस्थित होते. 

यावेळी विद्यार्थ्य़ांनी फलकाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी कोंढवा परिसरातील रस्त्यावर जनजागृती केली. व्यसनापासून दुर राहण्याची शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. चौका चौकात व्यसनाच्या होळीबाबत पथनाटय देखील सादर करण्यात आली.
    
यावेळी बोलताना योगगुरू आनंत झांबरे म्हणाले, गुटखा बंदी असतानाही अनेक ठिकाणच्या शाळेच्या परिसरात विक्री होताना दिसते. यापासून तरूण पिढीने दुर राहिल्यास चांगला समाज घडण्यास वेळ लागणार नाही. कार्य़क्रमाचे सुत्रसंचालन अंकुश घाडगे यांनी केले

Web Title: marathi news pune news holi culture