हवेली व दौंड तालुक्यात गावठी दारु अड्ड्यांवर छापे

जनार्दन दांडगे
शनिवार, 30 डिसेंबर 2017

लोणी काळभोर : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या नेतृत्वाखालील उत्पादन शुल्क विभागाच्या वीसहुन अधिक कर्मचाऱ्यांनी हवेली व दौंड तालुक्यात अठरा गावठी दारु बनविणाऱ्या ठिकाणावर छापा टाकुन, गावठी दारु व दारु बनविण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन असा अकरा लाख रुपयांचा एैवज जप्त केला आहे. ही कारवाई मागिल तीन दिवसात करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नंदकुमार जाधव यांनी दिली.

लोणी काळभोर : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या नेतृत्वाखालील उत्पादन शुल्क विभागाच्या वीसहुन अधिक कर्मचाऱ्यांनी हवेली व दौंड तालुक्यात अठरा गावठी दारु बनविणाऱ्या ठिकाणावर छापा टाकुन, गावठी दारु व दारु बनविण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन असा अकरा लाख रुपयांचा एैवज जप्त केला आहे. ही कारवाई मागिल तीन दिवसात करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नंदकुमार जाधव यांनी दिली.

 जिल्हा (ग्रामिण) पोलिस अधिक्षक सुवेज हक व त्यांचे सहकारी ग्रामिण पोलिसांच्या हद्दीत गावठी दारु विक्री व उत्पादन, मटका व जुगार यासारखे सर्व प्रकारचे अवैध धंदे बद असल्याचा दावा करीत आहेत. मात्र मागील तीन दिवसात राज्य उत्पादन शुल्क विभागाने ढेरे कॉक्रेट, हांडेवाडी, औताडेवाडी, वडकी, लोणी काळभोर येथील सिद्राम मळा, तरडे व दौंड तालुक्यातील बोरी ऐंदी, कासुर्डी, भांडगाव, चौफुला, वाखारी, बावीस फाटा, खुटबाव या परीसरात छापे टाकुन तब्बल अकरा लाख रुपयांचा ऐवज जप्त केल्याने पोलिसांच्या अवैध धंदे बंद या दाव्यातील हवा निघून गेली आहे. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक व विभागीय भरारी पथकाने पूर्व हवेली तालुक्यातील ढेरे कॉक्रेट, हांडेवाडी, औताडेवाडी, वडकी, लोणी काळभोर येथील सिद्राम मळा, तरडे व दौंड तालुक्यातील बोरी ऐंदी, कासुर्डी, भांडगाव, चौफुला, वाखारी, बावीस फाटा, खुटबाव या ठिकाणी छापे टाकले. यामध्ये दारू तयार करण्यासाठी लागणारे सुमारे २ हजार ३०० लीटर रसायन, ४५ हजार ४०० लिटर तयार गावठी दारू व दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य असा सुमारे ११ लाख ८ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ३१ डिसेंबरच्या पूर्वसंध्येला राज्य उत्पादन शुल्क खात्याने केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. 

निरीक्षक जे. बी. होले, अनंत झाडे, गणेश वाव्हळे, अशोक पाटील, उषा दहिफळे, शरद हांडगर, सतीश पोंधे, संदीप मांडवेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा अधिक तपास उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नंदकुमार जाधव करीत आहेत. 

पुणे-सोलापूर महामार्गावरील अवैध दारु विक्री जोरात, हक यांच्या भूमिकेकडे नागरीकांचे लक्ष दरम्यान पुणे-सोलापुर महामार्गावर हडपसर ते इंदापुर या दरम्यान अपवाद वगळता, सर्वच हॉटेल व ढाब्यावर देशी व विदेशी दारु विक्री अवैध पध्दतीने जोरात चालु आहे. पोलिसांनी हॉटेल चालकांना व ढाबे चालकांना आपआपल्या रिस्कवर दारु विक्रीचे तोंडी परवाने दिल्याने, सर्वच ठिकाणी दारु विक्री जोरात आहे. पोलिस अधिक्षक सुवेज हक यांनी जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करकण्याचे आदेश दिले होते. व प्रभारी अधिकाऱ्यांनी आपआपल्या हद्दीतील अवैध धंदे बंद केल्याचे लेखी रिपोर्ट अधिक्षक कार्यालयाला दिले आहे. मात्र उत्पादन शुक्ल विभागाच्या वरील कारवाईने पोलिसांचे पितळ मात्र उघडे पडले आहे.

Web Title: Marathi news pune news illegal liquor