राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यविक्रेत्या टोळीचा पर्दाफाश

Talegao
Talegao

तळेगाव स्टेशन : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तळेगाव दाभाडे क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने बुधवारी खेड तालुक्यातील वाडा येथे चायनीज सेंटर आणि जनरल स्टोअर्स दुकानावर छापा टाकून, दादरा नगर हवेलीत विक्रीस मान्यता असलेल्या परराज्यीय मदयविक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. पाच जणांना अटक करत दुचाकीसह दिड लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तळेगाव दाभाडे कार्यालयाला भिमाशंकर रस्त्यावरील वाडा येथील काही चायनीज आणि जनरल स्टोअर्स दुकानातून महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडवत, दादरा नगर हवेलीत विक्रीस मान्यता असलेल्या परराज्यीय विदेशी ब्रॅन्डच्या दारुची चढ्या दराने बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथक बुधवारी (ता.07) तपासणी करत असताना वाडा येथील महाराष्ट्र चायनीज, ए-1 चायनीज, स्वराज जनरल स्टोअर्स या ठिकाणी छापा टाकला असता मद्यविक्री होत असल्याचे उघडकीस आले. पथकाने मद्यसाठयासह नवनाथ दत्तात्रय मोरे (30, वाडा ता.खेड जि.पुणे) रमेश लक्ष्मण उंडारे (३५, वाडा ता.खेड जि.पुणे) आणि महेश किसन मोरे (31 वाडा, ता.खेड जि.पुणे) यांना जागीच अटक केली. 

गुन्ह्याचा पुढील तपास केला असता सदरचे विदेशी मद्य राक्षेवाडी येथील इसमाकडून घेतल्याचे अटक आरोपींनी सांगितल्यामुळे, पथकाने राक्षेवाडी येथे जाऊन हेमंत धनराज पाटील (राक्षेवाडी,ता.खेड,पुणे) याला दादरा नगर हवेली विक्रीस मान्यता असलेले विदेशी मद्याचे १० बॉक्स (४८० बॉटल्स) सह ताब्यात घेतले. याबरोबरच मद्य साठवलेल्या घराचा मालक अविनाश दत्तात्रय घाडगे (घडई मैदान गोपाळबुवा मंदिरामागे, राजगुरुनगर ता.खेड, पुणे) याला देखील त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी अॅक्टीवा स्कुटी आणि गुन्ह्यातील जप्त विदेशी मद्य मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत रु. १,५६,५६०/- एवढी आहे. सर्व आरोपींना गु.र.क्र. २७/२०१८ दि.०७/०२/२०१८ अन्वये गुन्हा दाखल करून आज रोजी मा.न्यायालय खेड येथे पोलीस कस्टडी मिळणेकामी हजर करण्यात आले आहे. तळेगाव दाभाडे विभागाचे निरीक्षक दीपक परब, उपनिरीक्षक नरेंद्र होलमुखे, संजय सराफ सहायक उपनिरीक्षक रवींद्र भूमकर जवान प्रमोद पालवे, अतुल बारंगुळे, संतोष गायकवाड, शिवाजी गळवे जवान वाहनचालक अर्जुन भताने यांच्या पथकाने कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com