पुणे-सातारा महामार्गावर टोल भरूनही असुविधा

महेंद्र शिंदे
शुक्रवार, 16 मार्च 2018

खेड-शिवापूर (पुणे) : पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर प्रवाशांना टोल भरूनही असुविधेचा सामना करावा लागत आहे. गेल्या दिड वर्षांपासून येथील नवीन टोल नाक्यावरील स्वच्छतागृह बंद असल्याने प्रवाशांची विशेषतः महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांना टोल आकारला जातो. त्याबदल्यात रस्त्यावर प्रवाशांना आवश्यक सोई-सुविधा पुरविणे आवश्यक असते. या रस्त्यावरील टोल नाक्यावर प्रवाशांच्या सोईसाठी स्वच्छतागृह असणे आवश्यक असते. 

परंतु पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर येथील नवीन टोल नाक्यावरील स्वच्छतागृह बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होते आहे. या नवीन टोल नाक्यावरील स्वच्छतागृह गेल्या दीड वर्षांपासून बंद आहे. टोल भरून पुढे आल्यावर अनेक प्रवासी स्वच्छतागृहासाठी वहाने बाजूला घेतात. मात्र येथील स्वच्छतागृह बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेक पुरुष प्रवासी नाईलाजाने याठिकाणी   उघड्यावर नैसर्गिक विधी उरकतात. त्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली आहे. तर महिला प्रवाशांची मात्र याठिकाणी मोठी गैरसोय होते आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे-सातारा टोल रोड कंपनी प्रवाशांच्या या गैरसोईकड़े दुर्लक्ष करत आहे.

टोल नाक्यावरच प्रवाशांच्या सोइसाठी स्वच्छतागृह नसेल तर या रस्त्यावर प्रवाशांकडून टोल घेण्याचा कोणताही अधिकार यांना नाही. टोल कंपनीने प्रथम प्रवाशांना सुविधा पुरविण्याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे अनेक महिला प्रवाशांनी सांगितले. 

याबाबत खेड-शिवापूर टोल नाक्याचे व्यवस्थापक बद्रीप्रसाद शर्मा म्हणाले, "या नवीन टोल नाक्यावरील स्वच्छतागृह तयार आहेत. मात्र पुढील काही बांधकाम बाकी असल्याने ते बंद आहे. हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आम्ही बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत. मात्र तरीही ते दखल घेत नाहीत."

Web Title: Marathi news pune news inconvenience to travelers no toilets