इंदापूर तालुक्यात विकास केवळ वर्तमानपत्रात : हर्षवर्धन पाटील

प्रा. प्रशांत चवरे
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

भिगवण : इंदापुर तालुक्यामध्ये मागील साडेतीन वर्षात मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून निरा नरसिंहपुर मंदिराचे काम तर केंदीय मंत्री नितीन गडकरी यांचे माध्यमातून डाळज रस्त्याचे काम झाले आहे. मागील साडेतीन वर्षांत तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी किती कामे मंजूर करुन आणली व पूर्णत्वास नेली याचा हिशोब जनतेला द्यावा. तालुक्याच्या लोकप्रतिनिधींकडुन विकासकामांबाबत लोकांची दिशाभूल होत असून विकास केवळ वर्तमानपत्रातच दिसतो, अशी बोचरी टीका माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचेवर केली.

इंदापुर तालुक्यातील भिगवण पंचायत समिती गणांमध्ये युवक डाळज क्र. १, कुंभारगांव, पोंधवडी, मदनवाडी, तक्रारवाडी डिकसळ गावांमध्ये युवक काँग्रेसच्या शाखांच्या उदघाटन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते करण्यात आले.

शाखांच्या उदघाटनानंतर डिकसळ (ता. इंदापुर) येथे जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. काँग्रेस तालुकाध्यक्ष कृष्णाजी यादव, पंचायत समितीचे सभापती करणसिंह घोलप, पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत काजळे, उपाध्यक्ष सुनिल काळे, कर्मयोगीचे संचालक यशवंत वाघ, संपत बंडगर, रंगनाथ देवकाते, सतीश काळे डिकसळचे सरपंच सुर्यकांत सवाणे, उपसरपंच सायली गायकवाड उपस्थित होते.

श्री. पाटील पुढे म्हणाले, युवकांमध्ये गावांचे प्रश्न सोडविण्याची क्षमता असते त्यामुळे त्यांना विधायक दिशेने वळविण्यासाठी व गावातील अरोग्य, स्वच्छता यासारखे प्रश्न युवक गावातच सोडवतील. गावांत कोणावर अन्याय होत असेल त्यांना न्याय मिळवुन देण्याचे काम युवक संघटनेच्या माध्यमातून होईल त्यासाठी आवश्यक ती ताकद युवकांच्या पाठीशी उभी करु. आगामी काळांमध्ये इंदापुर तालुक्यामध्ये गांव तेथे युवक काँग्रेसची शाखा सुरु करण्यात येणार आहे.  

करणसिंह घोलप म्हणाले, सध्या तालुक्यामध्ये अधिकाऱ्यांमार्फत जनतेवर अन्याय होत आहे. २०१९ मध्ये इंदापुर तालुक्यामध्ये निश्चित बदल होणार आहे त्यावेळी अधिकाऱ्यांना त्यांनी केलेल्या अन्यायाचा जाब विचारु. माजी सहकारमंत्री यांनी इंदापुर तालुक्यामध्ये विकासाचा डोंगर उभा केला आहे. युवक मेळाव्यांच्या माध्यमातून युवकांना रोजगार  मिळवुन दिला आहे. तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार असलेल्या हर्षवर्धन पाटील यांचे पाठीशी युवकांनी खंबीरपणे उभे रहावे.  यावेळी अॅड. कृष्णाजी यादव, तुषार खराडे, हनुमंत काजळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पप्पु भोंग यांनी केले सुत्रसंचालन देविदास कुंभार यांनी केले तर आभार शिवदास सुर्यवंशी यांनी मानले.

Web Title: marathi news pune news Indapur Development Harshvardhan Patil