शेळगावमधील बंदिस्त गटार योजनेचे काम निकृष्ट

राजकुमार थोरात
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

वालचंदनगर : शेळगाव (ता.इंदापूर) येथील बंदिस्त गटार योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून कामाची दुरुस्ती करण्याची मागणी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक आबासाहेब शिंगाडे यांनी केली.

शेळगाव येथे ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून सुमारे १४ लाख रुपये खर्चून गावामध्ये एक कि.मी. लांबीमध्ये बंदिस्त गटार योजनेचे काम सुरु आहे. हे काम करीत असताना ठेकेदाराने चेंबरच्या कामासाठी कमी प्रमाणात सिमेंट व वाळूचा वापर केला आहे. तसेच दोन पाईप जोडण्याचे काम ही निकृष्ट पद्धतीने केले आहे.

काम झाल्यानंतर त्यावर पाणी मारण्याची गरज असते. मात्र ठेकेदाराने पाणी मारण्यास टाळाटाळ केली आहे. अनेक चेंबरला प्लॅस्टर न करताच चेंबर बुजविण्यात आल्याचा आरोप शिंगाडे यांनी केला.

निकृष्ट कामामुळे गटार योजना सुरु झाल्यानंतर गटारामधून पाणी सुरळीत वाहण्यास अडचण येणार असल्याने गटार योजनेचे काम चांगल्या दर्जाचे करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

यासंदर्भात ग्रामसेवक दत्तात्रेय इनामे यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले की, 'संबधित गटार योजनेचे काम ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून सुरु असून याचे अॉनलाईन टेंडर झालेले आहे. ठेेकेदाराला कामाचे पैसे दिलेले नाहीत. मी गेल्या पंधरा दिवसापासून रजेवरती होतो. नागरिकांच्या तक्रारींनुसार निकृष्ट कामाची पाहणी करुन योग्य कारवाई करण्यात येईल.'

Web Title: marathi news pune news Indapur News PWD works