शिरुरच्या प्रत्येक गावातील ध्वजारोहण माजी सैनिकांच्या हस्ते : पाचंगे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

शिक्रापूर (पुणे) : माजी सैनिकांचा सन्मान म्हणून यापुढे शिरुर तालुक्यातील प्रत्येक गावातील ध्वजारोहण माजी सैनिकांच्याच हस्ते व्हावे. यासाठी आपले प्रयत्न सुरू असून शिरुर पंचायत समितीने पुढाकार घेतल्यास असे करणारा शिरुर हा देशातील पहिला तालुका होणार आहे म्हणूनच आपण गावा-गावात ग्रामसभांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी जाहिर केले. 

शिरुर तालुका भारतीय माजी सैनिक संघाचा सातवा वर्धापनदिन आमदार बाबुराव पाचर्णे, माजी सभापती मंगलदास बांदल, संघटनेचे जिल्हा प्रमुख कर्नल जगजीतसिंग, कर्नल पी.व्ही.गोरे, कर्नल एम.डी.शिवरकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत येथील पाबळ चौकात नुकताच साजरा झाला. यावेळी बोलताना संजय पाचंगे यांनी सांगितले की, जनआंदोलनाने राज्यातील पहिली टोलबंदी पुणे-नगर रोडची झाली, तालुक्यातील सर्व गावांचा दारुबंदीचा ठराव शिरुरचाच या शिवाय जनतेमधून सरपंच व्हावा या मागणीचा राज्यातील पहिला ठरावही शिरुर पंचायत समितीचाच. त्याच धर्तीवर आता शिरुर तालुक्यातील प्रत्येक गावात ध्वजारोहणाचा मान गावातीलच जेष्ठ माजी सैनिकांना देण्यासाठी क्रांतीवीर प्रतिष्ठाण पुढाकार घेत असून या उपक्रमात स्थानिक सरपंचांना कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान देऊन सन्मान राखण्याबाबत सुचित केले आहे. याबाबत गरज पडल्यास त्या-त्या गावातील ग्रामसभांचे ठराव घेण्याचा निश्चयही पाचंगे यांनी व्यक्त केला.  

सैनिकांच्या कायमस्वरुपाच्या कार्यालय जागेसाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी सांगितले तर पुढील वर्षीचा कार्यक्रम नव्या कार्यालयातच करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी सांगितले. यावेळी माजी सैनिक पत्नी, मुले आणि कुटुंबांचे सत्कार करण्यात आले. पुढील वर्षभरात शिरुर तालुक्यात संघटनेच्या चार शाखा करण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. कार्यक्रमाला मेजर वाय.एस.महाडीक, ए.के.कोल्हटकर, आर.बी.साळवी, पी.एस.आठवले आदींसह शिरुर तालुका अध्यक्ष संभाजी धुमाळ, शामराव धुमाळ, सचिव बाळासाहेब नवले, कार्याध्यक्ष संतोष खैरे आदींसह मोठ्या संख्येने माजी सैनिकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात पुढाकार घेतला. 

Web Title: Marathi news pune news independence day flag hosting