उद्योजकतेवर आंतरराष्ट्रीय परिषद 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

मांजरी (पुणे) : भारतात स्कील इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँड इंडिया, मेक इन इंडिया या योजनांमुळे उद्योगक्षेत्रात उद्योजकतेसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. जागतिकीकरणानंतर जगाची बाजारपेठ उद्योग-व्यवसायासाठी खुली झाली असून व्यापाराच्या नवनव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. विकसनशील देशातील सरकारने युवकांना व्यवसायासाठी आर्थिक पाठिंबा देऊन प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतिपादन नेपाळ येथील त्रिभुवन विद्यापीठाचे आधिष्ठाता डॉ. ध्रुबा गौतम यांनी केले. 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा वाणिज्य विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ‘उद्योजकता आणि स्टार्टअप : प्रवाह, संधी आणि आव्हाने’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषेदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. ध्रुबा गौतम बोलत होते. प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या  डॉ. शर्मिला चौधरी यांनी केले. 

उद्योजक संतोष खर्डेकर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब बेंद्रे, डॉ. आनंद महाजन, समन्वक डॉ. गंगाधर सातव, डॉ. सुनिता डाकले, डॉ. ई. जे जगताप, डॉ. शुभांगी औटी, प्रा. आर. एस. वाल्हेकर आदी यावेळी उपस्थित होते. परिषेदेमध्ये डॉ. महेंद्रनाथ मोताह (मॉरिसेस) डॉ. असोका जिनादासा (श्रीलंका), डॉ. हिमाचालन दासराजू, माया सालीमथ जी, डॉ. मंजुषा कदम, संतोष दास्ताने, अनिल कुमार, डॉ. प्रफुल्ल पवार आदी विषयतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. अॅड. मोहनराव देशमुख म्हणाले “देशात स्वयंरोजगार व उद्योजक निर्माण होण्यासाठी व्यावसायिक, उद्योजक यांचे मार्गदर्शन घेऊन कौशल्याधिष्ठीत, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम निश्चित करावेत.” उद्योजक खर्डेकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभांगी औटी यांनी केले. डॉ. भाऊसाहेब बेंद्रे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन समन्वक डॉ. गंगाधर सातव डॉ. सुनिता डाकले यांनी केले.

Web Title: Marathi news pune news international entrepreneurship