महिलांना 'माणूस' म्हणून किंमत द्या : जावेद अख्तर

Javed Akhtar
Javed Akhtar

पुणे : ''तुमच्या मनाला जे पटेल ते तुम्ही जरूर करा. मात्र देश, समाज आणि साहित्यावर प्रेम करा. महिलांना 'देवी'ऐवजी माणूस म्हणून किंमत द्या. चांगल्या शब्दातून साहित्याची निर्मिती होते, म्हणून शब्दांना सुद्धा किंमत द्या. 'मी काय करू शकतो किंवा शकते', हे ओळखून भविष्यातील ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करा,'' असा सल्ला गीतकार व संवाद लेखक जावेद अख्तर यांनी तरुणाईला दिला. 

फिक्की पुणे विभाग आणि सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आयोजित 'शब्दोत्सव' साहित्य महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. अवजड उद्योग व सार्वजनिक संस्था राज्यमंत्री बाबूल सुप्रिओ, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालक डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, फिक्की पुणे विभागाच्या अध्यक्षा वर्षा चोरडिया, सबिना सांगवी उपस्थित होते. 

अख्तर म्हणाले, ''स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक बदल घडले. माझ्या अगोदरच्या पिढीला देशप्रेम अभिप्रेत होते. माझ्या पिढीचे प्रश्‍न निराळे होते. आजच्या तरुणाईचे प्रश्‍न वेगळे आहेत. देशासाठी आपणही काही करू शकतो, ही इच्छाशक्ती पाहिजे. तरुण-तरुणींना साहित्य, कलाक्षेत्रात रुची आहे. वक्ता होण्यासाठी प्रथम चांगला श्रोता व्हावे लागते. तसे मानवी स्वभावाच्या पैलूंचे निरीक्षण करायला व ओळखायला साहित्य शिकविते.'' 

सुप्रिओ म्हणाले, ''जसा विचार करतो, तसे आपण घडत असतो. अशक्‍य असे जगात काहीच नसते. महाविद्यालयीन जीवनात एखादी गोष्ट करण्याचा उत्साह व प्रोत्साहन मिळते. मी बारावीत होतो, तेव्हा गायनाच्या स्पर्धेत भाग घेतला. कलकत्याहून मुंबईला आलो आणि आता राजकारणात आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com