जेसीबीचा स्फोट होऊन कचऱ्याने पेट घेतला

Fire
Fire

हडपसर (पुणे) : जेसीबीचा स्फोट होऊन रामटेकडी येथील रोकेम कंपनीच्या आरडीएफने पेट घेतला. या घटनेत मोठया प्रमाणात प्लांटमधील मशनरी आणी कचऱ्यापासून तयार झालेले आरडीएफ जळून खाक झाले. ही घटना बुधवारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. महापालिकेच्या पाच अग्नीशामक गाड्यांच्या सहाय्याने आग विझविण्याचे काम सुरू आहे. मात्र कचरा व आरडीएफचे मोठे डोंगर असल्याने सुरवातील थोडी आग लागली व नंतर ती मोठया प्रमाणात वाढली. या घटनेमुळे परिसरात मोठया प्रमाणात धूराचे लोट पसरले होते.  

जेसीबीच्या सहाय्याने कंपनीतील आरडीएफचे सपाटीकरणाचे काम सुरू होते. जेसीपी चालक जेसीबी बंद करून जेवण्यासाठी गेला. त्यावेळी शॅार्ट सर्कीट होऊन छोटीशी आग लागली. त्यानंतर मोठी आग भडकली. त्यातच आगीमुळे जेसीबीच्या डिझेल टॅंकचा स्फोट झाला. डिझेल सर्वत्र पसरल्याने मोठया प्रमाणात आग पेटली.

रोकेम कंपनीचे प्रकल्प संचालक योगेश देशपांडे म्हणाले, आगीत मोठया प्रमाणात मशनरी जळाल्या आहेत. तसेच केबीन, जेसीपी जळून खाक झाला आहे. साडेतीन हजार टन आरडीएफ जळून खाल झाले आहे. या घटनेत सुमारे साडेतीन कोटी रूपयांचे नुकसाना झाले आहे. 

घनकचरा विभागा प्रमुखे सुरेश जगताप म्हणाले, ही आग जेसीबी चालकाच्या निष्काळजीपणामुळे लागली आहे. संतोष टोकलवाल याने हयगयीने जेसीबी चालविल्यामुळे त्याच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत. आरडीएफ म्हण्जे कचऱ्यापासून तयार केलेले इंधन होय. ते ज्वलनशील असल्याने आग आटोक्यात आणणे कठीण होत आहे. मात्र महापालिकेच्या पाच आग्नीशामक गाडयांच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी गंभीर आरोप करताना म्हटले की, औरंगाबाद येथील कचरा प्रश्न १६ दिवसांपासून सुटला नाही. त्यामुळे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की नवीन कचरा डंपिंग प्रकल्पास इंचभरही जागा देणार नाही, मात्र  आज हडपसर येथील रोकेम प्रकल्पास भीषण आग लागली, यामध्ये काळेबेरे असून हडपसर नागरिकांच्या माथी कचरा लादून येथील जीवनमान धोक्यात आणायचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. त्यातच नव्याने होऊ घातलेल्या ७५० टन कचरा प्रकल्पास हडपसरकर नागरिकांचा तीव्र विरोध असताना केवळ राजकीय अट्टहासपोटी व आर्थिक लागेबांधे जपण्यासाठी पुणे महापालिका भाजप सत्ताधारी कचरा प्रकल्प लादत आहेत, कचरा प्रकल्पात भीषण आग म्हणजे मोठे षडयंत्र असून याचा जाब हडपसरचे नागरिक रस्त्यावर उतरून विचारतील.

हडपसर आग्नीशामक केंद्रप्रमुख शिवाजी चव्हाण, राजू टिळेकर, अमित शिंदे, बाबा चव्हाण, सखाराम पवार, राजाराम केदारी फायरमन सखाराम पवार, राजू टिळेकर, बाबा चव्हाण आणि कोंढवा आग्नीशामक केंद्र, भवानी पेठ सेंट्रल आग्नीशामक दलाच्यावतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com