युवकांना आवडीच्या क्षेत्रात काम करू द्यावे : देशमुख 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

पुणे : युवकांना त्यांच्या आवडीनुसार कार्यक्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य दिले, तर ते त्या क्षेत्रात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवू शकतात. त्यासाठी पालकांनी त्याप्रकारचे संस्कार करणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. 

युवा लेखिका तन्वी राठी लिखित 'कॉट बिटवीन द एनॉर्मीटी' या पुस्तकाचे प्रकाशन देशमुख व लेखक बख्तियार दादाभॉय यांच्या हस्ते झाले. या वेळी व्हीआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष बजरंगजी लोहिया, हिरालालजी मालू, विशाल सोनी, वर्धमान जैन आदी उपस्थित होते. 

दादाभॉय यांनी वाचन हा लिखाणाचा पाया असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ''वाचनातून माणूस समृद्ध होत असतो. या प्रक्रियेतूनच निघालेले शब्द हेच वाचकांना आकर्षित करण्यासाठी पुरेसे असतात.'' 

पुस्तकाविषयी माहिती देताना लेखिका तन्वी राठी म्हणाल्या, ''दुसऱ्या महायुद्धातील एका ज्यू मुलगी आणि तिच्या कुटुंबाची ही गोष्ट आहे. जर्मन सैनिकाच्या प्रेमात ती मुलगी पडते. जर्मन म्हणजेच नाझी सैनिक आणि ज्यू मुलगी यांचे नाते, नाझी विरुद्ध ज्यू हा संघर्ष, नात्यातील उतार-चढाव, मैत्री, हिंमत या सर्वच बाबी या पुस्तकाच्या रूपाने आपल्यासमोर मांडत आहे.'' 

पुस्तक प्रकाशन सोहळ्यात विक्री झालेल्या पुस्तकाची रक्कम भारतीय समाज सेवा केंद्र या सेवाभावी संस्थेला देण्यात येणार आहे. विशाल सोनी यांनी प्रास्ताविक केले. अमिता चांडक यांनी सूत्रसंचालन केले. गोकुळ राठी यांनी आभार मानले. 

Web Title: marathi news Pune News Jobs Creation Subhash Deshmukh