पुणे : जिटीपीएलच्या एक ते दीड हजार ग्राहकांचे प्रेक्षपण बंद

राजेंद्रकृष्ण कापसे 
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

कोंढवे धावडे (पुणे) : दूरचित्रवाहिन्यांचे जिटीपीएल कंपनीच्या सेट टॉप बॉक्सच्या सुमारे एक ते दीड हजार ग्राहकांचे शनिवारपासून अचानक प्रेक्षपण बंद करण्यात आले आहे. याबाबत, ग्राहकांना कोणतीही सूचना माहिती न देण्यात आलेली नाही. यामुळे ग्राहकांनी कोंढवे-धावडे येथील केंद्रावर जाऊन नाराजी व्यक्त केली. 

कोंढवे धावडे (पुणे) : दूरचित्रवाहिन्यांचे जिटीपीएल कंपनीच्या सेट टॉप बॉक्सच्या सुमारे एक ते दीड हजार ग्राहकांचे शनिवारपासून अचानक प्रेक्षपण बंद करण्यात आले आहे. याबाबत, ग्राहकांना कोणतीही सूचना माहिती न देण्यात आलेली नाही. यामुळे ग्राहकांनी कोंढवे-धावडे येथील केंद्रावर जाऊन नाराजी व्यक्त केली. 

कोंढवे धावडे, उत्तमनगर, न्यू कोपरे, शिवणे परिसरात शनिवारी अचानक जिटीपीएल कंपनीचे सेटटॉप बॉक्स असलेल्या सुमारे एक ते दीड हजार ग्राहकांचे प्रेक्षपण थेट बंद करण्यात आले. ग्राहकांना वाटले किरकोळ काहीतरी समस्या उदभवली असेल तासात प्रेक्षपण सुरू होईल अशी अपेक्षा होती. परंतु संध्याकाळ पर्यंत प्रेक्षपण सुरू आले नाही.  काहींनी या कार्यलयाच्या मोबाईल संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते फोन उचलत नव्हते. त्यानंतर, जिटीपीएल कंपनीच्या वेबसाईटवर पुण्यात सिंहगड रस्त्यावरील कार्यलयात आहे. त्यांच्या दोन क्रमांकावर संपर्क सोडला असता एक उचलत नव्हते. तर एक क्रमांक दुसरीकडे जोडला होता. तो उचळल्यानंतर 30 सेकंदाने बंद होत होता. अशा प्रकारे, अहमदाबाद येथील कार्यालयात फोन केला असता. पुण्यातील एक दीड हजार नंबर का बंद आहेत याची माहिती मिळू शकली नाही.

कोंढवे-धावडे येथील जिटीपीएलच्या कार्यालयात नागरीकांनी येथील कर्मचाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला बील भरले असून देखील तुम्ही प्रेक्षपण का बंद केल्या त्यावर सेट टॉप बॉक्स नंबर घेऊन रविवारी रतेय साडे आठ वाजेपर्यंत प्रेक्षपण सुरू होईल असे सांगितले होते. परंतु सोमवारी, मंगळवारी देखील प्रेक्षपण बंद होते. 

कोंढवे धावडे केंद्रातील सुमारे 600 ते 700 ग्राहकांची  व त्यांच्याकडे असलेल्या सेट टॉप बॉक्सची माहिती येथील केंद्र चालकाकडे उपलब्ध नाही. परिणामी त्यांचे सर्व सेट टॉप बॉक्स बंद केले आहेत. नावावर असलेला सेट टॉप बॉक्स बिघडल्यानंतर तो काढून दुरुस्तीला दिला. त्याच्या जागी दुसरा बॉक्स बसविला परंतु तो दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने आहे. ही माहिती देखील या केंद्र चालकाकडे नाही. असे दीपेश शहा यांनी सांगितले. 

जिटीपीएल कंपनीने ट्राय (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण)च्या निर्देशानुसार प्रक्षेपण बंद करण्यापूर्वी ग्राहकांना 21 दिवसाची नोटीस दिलेली नाही. तातडीने सर्व प्रेक्षपण सुरू करावे. तांत्रिक अडचण असल्यास ग्राहकांना प्रत्यक्ष माहिती कळविने गरजेचे आहे. जास्त दिवस प्रेक्षपण बंद असल्यास कंपनीच्या किंवा ट्रायच्या वेबसाईटवरून तक्रार दाखल करता येते. अशी माहिती जिल्हा करमणूक कर अधिकारी सुषमा पाटील यांनी सकाळशी बोलताना दिली.

Web Title: Marathi news pune news jtpl cable