जुन्नरला नगरपालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई

दत्ता म्हसकर
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

जुन्नर (पुणे) : जुन्नरला नगर पालिका प्रशासनाच्या वतीने शहराच्या बाजारपेठेत आज मंगळवारी (ता. 27) दुपारी अतिक्रमण करणाऱ्या विरुद्ध कारवाई केली. वर्षांतील या ठिकाणची वर्षातील ही दुसरी कारवाई आहे. मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस व गृहरक्षक दलाचे जवानांच्या सहकार्याने केलेल्या कारवाईत धान्य बाजार व परिसरातील अनधिकृत टपऱ्या,हातगाड्या हटविल्या तसेच रस्त्याच्या कडेला बसून रहदारीस अडथळा करणारे भाजी, फळ, खाद्यपदार्थ विक्रेते यांना हटविले.

सुमारे 35 ते 40 जणांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली यामुळे या रस्त्याने आज मोकळा श्वास घेतला आहे. येथील नव्याने बांधलेल्या भाजी मंडईतील जागांचा लिलाव करण्यात आला आहे. मात्र किरकोळ फळ व भाजी विक्रेते तेथे न बसता रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय करीत असल्याने रहदारीस अडथळा होत होता. परिसरात अस्वच्छता होत असे तसेच टाकून दिलेला भाजीपाला खाण्यास मोकाट जनावरे फिरत असल्याने पायी चालणे कठीण होत असे. नगर पालिकेच्या चारही व्यापारी संकुलात आलेल्या ग्राहकांना आपली वाहने लावण्यास अडचणीचे होत होते.याबाबत नगरसेवक तसेच नागरिकांच्या असलेल्या मागणीनुसार ही कारवाई करण्यात आली असून यापुढील काळात दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: Marathi news pune news junnar encroachment