दहावी परीक्षार्थींच्या फॉर्म एकवर पर्यवेक्षकाच्या बोगस सह्या

दत्ता म्हसकर
बुधवार, 7 मार्च 2018

जुन्नर (पुणे) : जुन्नरला दहावीच्या परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकाने सतरा परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मराठी विषयाच्या पेपरला फॉर्म नंबर एकवर बनावट स्वाक्षऱ्या केल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पर्यवेक्षक व केंद्रसंचालक यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी शिफारस परीरक्षक तथा गटशिक्षणाधिकारी के.डी.भुजबळ यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय सचिवांकडे मंगळवारी (ता. 6) लेखी पत्राने केली आहे.

याबाबत शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयातील सहशिक्षक होना सहादू चिमटे यांनी सोमवारी (ता. 5) लेखी तक्रार दिली होती. या शाळेत दहावीचे परीक्षा केंद्र आहे. गुरुवारी (ता.1) प्रथम भाषा मराठी या विषयाचा पेपर होता. जुन्नर येथील कृष्णराव मुंढे विद्यालयातील उपशिक्षक तुळशीदास सहादू साबळे पर्यवेक्षक म्हणून काम पाहत होते. त्यांच्या ब्लॉकमध्ये 17 विध्यार्थी होते. पेपर झाल्यानंतर उत्तरपत्रिका तसेच सोबत परिक्षार्थीला बारकोड स्टिकर, उत्तरपत्रिका मिळाल्याची तसेच उपस्थितीची सही असलेला फॉर्म नंबर एक त्यांनी जमा केला होता. या फॉर्म वरील सह्या बनावट असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या चौकशीत विद्यार्थ्यांकडे असणाऱ्या ओळ्खपत्रावरील सह्या व फॉर्मवरील सह्यात फरक दिसून आला तसेच विद्यार्थ्यांनी देखील फॉर्मवरील सह्या आपल्या नसल्याचे सांगितले. यामुळे या बनावट सह्या साबळे यांनीच केल्या असल्याचे स्पष्ट झाले.

चिमटे यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने बनावट सह्या करणारे साबळे तसेच हा प्रकार माहीत असूनही दडपण्याचा प्रयत्न करणारे केंद्रचालक संजय माधव जोशी यांच्या विरुद्ध कारवाईची शिफारस भुजबळ यांनी केली आहे. साबळे यांचे पर्यवेक्षकाचे काम काढून घेण्याबाबत केंद्र संचालकांना स्वतंत्र पत्राने कळविण्यात आले आहे.

Web Title: Marathi news pune news junnar examiner fake signs on students paper 10th