जुन्नर - पारूंडे ग्रामपंचायत निवडणुक सरपंचपदी सुमित्रा पवार

दत्ता म्हसकर
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

जुन्नर : पांरुडे ता. जुन्नर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ब्रम्हनाथ ग्राम विकास पॅनेलच्या सुमित्रा पवार 884 मते मिळवून विजयी झाल्या असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर वाघमारे यांनी दिली.

या निवडणुकीत माजी सभापती दशरथ पवार यांच्या पॅनेलने पारूंडे ग्रामपंचायतीवर  एक हाती विजय मिळवला असून त्यांच्या पत्नीकडे सरपंच पदाची धुरा आली आहे. तर विरोधकांच्या ब्रम्हनाथ विकास आघाडीस एकही जागा मिळाली नाही. सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. निवडणूक निकाल ऐकण्यासाठी ग्रामस्थ व कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.

ब्रम्हनाथ ग्राम विकास पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील 
सुमित्रा दशरथ पवार -  884 सरपंच, मेघनाथ मारूती जाधव -203 सदस्य, 
प्रियंका जयवंत पवार -249 सदस्य, राजश्री किसन पुंडे -248 सदस्य, रोहीदास नामदेव जाधव -331 सदस्य, प्रविण तुकाराम पवार -309 सदस्य, आशा पंकज साबळे - 302 सदस्य, रहेमान अहमद शेख - 318 सदस्य, सुनिता अजित खोंड -342, सदस्य 
अर्चना अशोक पवार -327

Web Title: Marathi news pune news junnar grampanchayat elections