जुन्नरला मंदिर परिसरातील एक आगळी वेगळी होळी

दत्ता म्हसकर
गुरुवार, 1 मार्च 2018

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील अतिशय दुर्गम भागतील सुकाळवेढे या गावाच्या जवळ डोंगराळ भागात आदिवासी बांधवांचे वसलेले श्रध्दास्थान माता वरसुबाई देवस्थान.. येथे पुणे, नाशिक, मुंबई व अहमदनगर जिल्ह्य़ातील असंख्य आदिवासी बांधव   देवदर्शनासाठी येत असतात.

येथील सौंदर्यच एवढे लाजवाब आहे, की येथे शेकडो पर्यटकदेखील आकर्षित झाले आहेत. येथे येणाऱ्या भक्त तसेच पर्यटकांची वाढती गर्दी सुरू झाली. त्यांनी मंदिर परिसरात मोठय़ा प्रमाणावर प्लास्टीक कॅरिबॅग, पाण्याच्या बाटल्या टाकल्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण होत होती. हे पाहून  आज (गुरुवार) माजी सैनिक रमेश खरमाळे, वनरक्षक बोतार्डे यांच्या पुढाकाराने सुकाळवेढे ग्रामस्थांच्या सहकार्याने येथे लाकडांची होळी न करता पर्यावरणात पसरलेले प्लास्टिक गोळा करून त्या कच-याची एक आगळी वेगळी होळी मंदिराचे पुजारी भिमा भाऊ जावळे यांच्या हस्ते पेटवून साजरी करण्यात आली.

भविष्यात अशा स्वरूपाची होळी साजरी केली गेली तर पर्यावरणातील प्लास्टीक मुक्त होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होईल. येथे येणाऱ्या पर्यटकांनी या परिसरातील पावित्र्य राखून प्लास्टिक  कचरा तसेच मद्यपान करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमात नाथा विठ्ठल भांगे, संगिता नाथा भांगे (वरसावणे), किरण दशरथ केदार (आमलेवाडी), कृष्णा मरभळ (बोतार्डे), अमोल मरभळ (बोतार्डे), दौलत भागाजी साळवे (विश्वस्त), जानकू मोघाजी ढेंगळे आदि सहभागी झाले होते.

Web Title: marathi news Pune News Junnar Holi