बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांचे रास्ता रोको

दत्ता म्हसकर
बुधवार, 24 जानेवारी 2018

हिवरे खुर्द (ता.जुन्नर) येथे २१ रोजी झालेल्या बिबटयाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सविता वायसे (वय 30) यांचा पुणे येथील ससून रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी वन विभागाच्या विरोधात घोषणाबाजी करत हिवरे खुर्द येथे रस्ता रोको आंदोलन केले.

जुन्नर : हिवरे खुर्द (ता.जुन्नर) येथे २१ रोजी झालेल्या बिबटयाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सविता वायसे (वय 30) यांचा पुणे येथील ससून रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी वन विभागाच्या विरोधात घोषणाबाजी करत हिवरे खुर्द येथे रस्ता रोको आंदोलन केले.

त्यावेळी युवक राष्ट्रवादीचे उपप्रदेशाध्यक्ष अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, संतोष ठिकेकर व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये महिला व शालेय विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. वन विभागाचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे यांनी नागरिकांची समजूत घातली. उपाययोजना करणार असल्याचे सांगितले. उपस्थित नेते व नागरिकांच्या हस्ते त्यांना बिबट्यापासून संरक्षण मिळावे या आशयाचे निवेदन देण्यात आले.

Web Title: Marathi News Pune news Junnar News villagers Rasta Roko