पुणे- जुन्नर तालुक्यात दहावीची परीक्षा सुरळीत सुरू          

दत्ता म्हसकर
गुरुवार, 1 मार्च 2018

जुन्नर (पुणे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा आज (ता.1) जुन्नर तालुक्यात सुरळीतपणे सुरु झाली. या परीक्षेसाठी तालुक्यात आळे, पिंपळवंडी, बेल्हे, ओतूर, येणेरे, निमगावसावा, मढ, आपटाळे, येथे प्रत्येकी एक तर जुन्नरला दोन अशी एकूण दहा केंद्र असून एकूण 5 हजार 347 परीक्षार्थी आहेत. याशिवाय नारायणगाव येथील केंद्रात 1 हजार 100 परीक्षार्थी आहेत. हे केंद्र मंचर ता.आंबेगाव येथील कस्टोडीयनच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे.

आज मराठीचा पहिलाच पेपर असल्याने आपल्या पाल्यास सोडविण्यासाठी तसेच शुभेच्छा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पालक मोठ्या संख्येने आले होते. सर्व परीक्षार्थींचे गटशिक्षणाधिकारी के.डी.भुजबळ व विस्तार अधिकारी,केंद्र संचालक यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांना निर्भय वातावरणात परीक्षा देता यावी म्हणून सर्व परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त  ठेवण्यात आला आहे.

परीक्षा कालावधीत गैरप्रकार रोखण्यासाठी जुन्नर तालुक्यात तीन भरारी पथके व 11 बैठी पथके स्थापन केली आहेत. केंद्रावर कोणताही गैरप्रकार होणार नाही याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व केंद्रसंचालक यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. जुन्नर तालुक्यातील केंद्रांचे बाबतीत तसेच परिक्षेबाबत विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास संबंधितांनी गटशिक्षणाधिकारी तथा कष्टोडीयन के. डी. भुजबळ मो.क्र.९८२२८०२०१९  यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: Marathi news pune news junnar taluka 10th exam starts