जुन्नर होणार राज्यातील पहिला पर्यटन तालुका

दत्ता म्हसकर
बुधवार, 21 मार्च 2018

पर्यटन मंत्री रावळ यांचे आश्वासन
     
जुन्नर - राज्यातील पहिला पर्यटन तालुका म्हणून जुन्नर तालुका घोषित करण्याचे राज्य सरकारने ठरविले असून, लवकरच याबाबतचा अध्यादेश काढण्यात येणार आहे. याबाबत पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती आमदार शरद सोनावणे यांनी सकाळशी बोलताना दिली. 

छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील पर्यटनाविषयी आमदार सोनावणे यांनी मंत्र्यांना माहिती दिली. तसेच तालुक्यातील विविध पर्यटन स्थळे व त्यासबंधी माहिती देणारी पुस्तिका पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांना आमदार सोनवणे यांनी दिली. यावेळी राज्य सरकारचे पर्यटन विषयक धोरणाची रावळ यांनी माहिती दिली. लवकरच जुन्नर तालुका पर्यटनचा शासकीय आदेश राज्य सरकारकडून काढण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: marathi news pune news junnar tourism