जुन्नर राज्यातील पहिला पर्यटन तालुका

junnar
junnar

जुन्नर - तालुक्याला विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून आज बुधवार ता.21 रोजी राज्याचे पर्यटन व सांस्कृतिक विभागाने जाहीर केले आहे. यामुळे राज्यातील पहिला  पर्यटन तालुका होण्याचा बहुमान जुन्नरला मिळाला असल्याचे आमदार शरद सोनवणे यांनी सकाळला सांगितले.

जुन्नर तालुका पर्यटन क्षेत्र तालुका म्हणून जाहीर करण्याचे राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केले होते. शिवजयंतीला याबाबत लवकरच शासनातर्फे निर्णय काढण्यात येईल असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले होते.  त्यानुसार आज कार्यसन अधिकारी रवींद्र लखोटे यांनी हा शासन निर्णय काढला आहे. याबाबत पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांची आमदार  सोनावणे यांनी भेट घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील पर्यटनाविषयी  मंत्र्यांना माहिती दिली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com