आमराईत बहरला मराठी वाचन कट्टा..

पराग जगताप
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

ओतूर ता.जुन्नर (पुणे) : आंब्याच्या झाडावर लटकलेली मराठी भाषेची महत्व सांगणारी पोस्टर्स आणि त्या गर्द छायेत बहरलेला मराठी वाचन कट्टा हे अनोखे चित्र बल्लाळवाडी ता.जुन्नर येथिल कैवल्यधाम आश्रमात पहायला मिळाले.औचित्य होते. जागतिक मराठी भाषा दिनाचे, इंग्रजी माध्यमातील शाळांतून मराठी दुरावली जातेय हा गैरसमज दूर करणारा हा आगळा उपक्रम होता.

कैवल्यधाम आश्रमाचे संस्थापक स्वामी कैवल्यानंद गिरीजी महाराज यांनी या कट्ट्यावर उपस्थित विद्या इंटरनॅशनल स्कूलच्या बालचमूंना मराठीचे महत्व सांगितले. मराठी ही महाराष्ट्राची समृद्ध भाषा आहे. ही प्रेमळ, हळुवार शब्दांनी रुजणारी तर, कठीण, वज्र शब्दांनी वार करणारी भाषा असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान या निमित्ताने प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी विषयाचे पुस्तक देऊन त्याचे या वाचन कट्ट्यावर वाचन करुन घेण्यात आले.

वाचन कट्टा उपक्रमाचा प्रारंभ कैवल्यानंद महाराज यांच्या हस्ते सरस्वती पूजन करुन करण्यात आले. यावेळी झाड देते फुल, झाड देते फळे, झाड देते छाया, झाड देते माया..अशा मराठी भाषेतील विविध कवीतांचे समूह वाचन देखील करण्यात आले. वाचनाची आवड वाढावी या दृष्टीने वाचन कट्ट्याचे आयोजन करुन वाचन उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहीती यावेळी देण्यात आली. शाळेचा शिक्षकवृंद, विश्वस्त यांनी यासाठी परिश्रम घेतले.

Web Title: Marathi news pune news junnar vachankatta students