जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत शिर्सुफळच्या जिल्हा परिषद शाळेला उपविजतेपद 

संतोष आटोळे
बुधवार, 31 जानेवारी 2018

शिर्सुफळ (बारामती) : येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत कबड्डी या खेळामध्ये मुलींच्या संघाने चुरशीच्या सामन्यात उपविजेते पटकावित यश संपादन केले. पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग, पंचायत समिती बारामती व अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यशवंतराव चव्हाण कला व क्रीडा व सांस्कृतिक महोत्साव 2017-18 अंर्तगत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा शारदानगर (ता.बारामती) येथे संपन्न झाल्या. 

जिल्ह्यातील तालुकास्तरावर विजयी झालेल्या तेरा संघांनी सहभाग घेतला. यामध्ये बारामती तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना शिर्सुफळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थांनी सहभागी होत मुलींच्या गटात कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली व आंबेगाव तालुक्याविरुध्द अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागल्याने द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. 

उपविजेत्या संघाला अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या अध्यक्षा विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेऴी जिल्हा शिक्षणाधिकारी शैलजा दराडे, पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, पंचायत समिती सदस्य भारत गावडे, लिलाबाई गावडे, गटशिक्षणाधिकारी किशोर पवार, विस्तार अधिकारी ओमासे, शाळासमिती अध्यक्ष बाळासाहेब म्हेत्रे यांच्यासह मुख्याध्यापक बाळासाहेब पामणे यांच्यासह अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. या यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक शिंदे यांच्यासह सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले. तर शाळेला उपविजेते पद मिळाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने यशस्वी खेळांडूंसह शिक्षकांचेही अभिनंदन होत आहे.

Web Title: Marathi news pune news kabaddi state level