बंदिश, ठुमरी व शास्त्रीय गायनाने कलाश्री संगीत महोत्सवाची सांगता

रमेश मोरे
सोमवार, 29 जानेवारी 2018

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील कलाश्री संगीत मंडळ प्रस्तुत, 21 व्या कलाश्री संगीतमहोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात राधानंद संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या तबला वादन व कलाश्री संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गायनाने झाली. कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन देवेंद्र नायर, नंदकिशोर ढोरे व मुरली नायर यांच्या हस्ते झाले.

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील कलाश्री संगीत मंडळ प्रस्तुत, 21 व्या कलाश्री संगीतमहोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात राधानंद संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या तबला वादन व कलाश्री संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गायनाने झाली. कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन देवेंद्र नायर, नंदकिशोर ढोरे व मुरली नायर यांच्या हस्ते झाले.

प्रथम सत्रात शाश्वती चव्हाण यांचे गायनाला रसिकांनी भरभरून दाद दिली. तिने राग मुलतानी मध्ये विलंबित एकतालात "आली री शाम" तर द्रुत त्रितालात "तुम बिन मानत नहीं जिया मोरा" या बंदीशी सादर केल्या. त्यानंतर द्रुत एकतालात एक बंदिश व कजरी सादर केली. तिला हार्मोनियमवर साथसंगत अविनाश दिघे, तबलासाथसंगत भरत कामत, तानपुऱ्यासाठी योगिनी ढगे व रुपाली थिटे यांनी साथसंगत केली. यानंतर दीपक भानुसे (बासरी) व उ.मोहम्मद अस्लम खान(सारंगी) यांच्या जुगलबंदिने कार्यक्रमात रंगत आली. त्यांना तबला साथ उ. नवाज मिरजकर यांनी साथ केली. त्यांनी राग "जोग" मध्ये आलाप, जोड, झाला सादर करून बंदिश  ठुमरी सादर केली.

कार्यक्रमा दरम्यान "कलाश्री पुरस्कार 2018" या वर्षीचा "कलाश्री पुरस्कार", अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष पं. प्रभाकर भंडारे यांना नगरसेविका सौ. माई ढोरे यांच्या शुभहस्ते देण्यात आला तसेच यावर्षीचा स्व.शकुंतला नारायण ढोरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा "कलाश्री युवा कलाकार 2018" हा पुरस्कार सरोदवादक सारंग कुलकर्णी यांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. भगवानराव वाल्हेकर यांच्या शुभहस्ते वितरित करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे, आरती राव, संजय जगताप, सुलभा गुळवे, ह.भ.प. तुकाराम भाऊ, ह.भ.प.सुभाष ढोरे, मंगेशजी वाघमारे, गजानन वाव्हळ, कलाश्री संगीत मंडळाचे अध्यक्ष पं. सुधाकर चव्हाण, मनोहर ढोरे, नंदकिशोर ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कलाश्री संगीत महोत्सवाची सांगता पंडिता कलापिनी कोमकली यांच्या यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग केदारमध्ये "जोगी जागो रे" ही विलंबित एकतालात तर "जो दिया सूनहरी" ही द्रुत तीनतालमध्ये अतिशय लिलया सादर केल्या. त्यानंतर त्यांनी एक तराना व एक भजन गायनाने कार्यक्रमाची सांगता केली. त्यांना हार्मोनियमवर साथसंगत राहुल गोळे, तबलासाथसंगत प्रशांत पांडव, पखवाजाची साथसंगत गंभीर महाराज अवचार, टाळासाठी सदाशिव सावळे तसेच तानपुऱ्यासाठी योगिनी ढगे व सौ. सरला इंगळे यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नामदेव तळपे व सौ.प्राची पांचाळ यांनी केले. कार्यक्रमाचे छायांकन श्री नामदेव तौर यांनी केले.

 

Web Title: Marathi news pune news kalashri snagit mahotsav