कात्रज घाटाचे डांबरीकरण दोन महिने होऊनही आहे तसेच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

खेड-शिवापूर (पुणे) : कात्रज घाट रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात होऊन दोन महिने उलटले तरी अजुन हे काम खडीकरणाच्या पुढे सरकलेले नाही. या परिस्थितीत या रस्त्यावर वाहन चालविणे मोठे जिकीरीचे झाले आहे. त्यामुळे कात्रज घाटातील खड्डे परवडले पण रस्त्याचे काम नको, अशी अवस्था सध्या घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची झाली आहे.

डिसेंबर 2017 च्या अखेरीस कात्रज घाट रस्त्यावरील भिलारेवाडी ते गुजरवाडी आणि शिंदेवाड़ी हद्दीतील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले. त्यासाठी कात्रज घाटातील वाहतुकीत बदलही करण्यात आला होता. मात्र काम सुरु झाल्यानंतर सुमारे एक महिन्यात या कामाचा खडीकरणाचा टप्पा पूर्ण करण्यात आला. त्यानंतर सुमारे एक महिन्यापासून घाट रस्त्यातील डांबरिकरणाचे काम ठप्प आहे. तर मांगडेवाडी येथील रस्त्याच्या एका मोठ्या टप्प्यात अजुन कामाला सुरुवातही करण्यात आलेली नाही.

खडीकरणाच्या कामानंतर काही दिवसात त्यावर डांबरीकरण करणे गरजेचे होते. मात्र महीना उलटुनही डांबरिकरण करण्यात आले नाही. खडीकरणाच्या कामामुळे अनेक टोकदार दगड वर आले आहेत. त्यावरून वहाने गेल्याने अनेकदा चाक पंक्चर होत आहेत. तर या खडीकरणावरुन वाहने आदळत असल्याने वाहन चालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे खड्डे परवडले; पण हे रस्त्याचे काम नको असे म्हणण्याची वेळ नागरीकांवर आली आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता मांगडेवाडी येथे रस्त्यामधुन जलवाहिनी टाकण्याचे काम बाकी होते. त्यामुळे डांबरीकरण रखडले होते. जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. येत्या आठवड्यात डांबरिकरण सुरु होईल. असे त्यांनी सांगितले.
 
Web Title: Marathi news pune news katraj ghat road repairing