खडकवासला मतदार संघाला 135 कोटीचे पॅकेज

राजेंद्रकृष्ण कापसे
गुरुवार, 22 मार्च 2018

खडकवासला - शहरातून बाहेर पडणारे रस्ते यामध्ये नांदेड ते वेल्हे, खानापूर ते पानशेत व सिंहगड ते खेड- शिवापूर ही कामे सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्लूडी)च्या वतीने मंजूर केली आहेत. या मार्गावरील रस्ता व पुलाच्या रुंदीकरणासह काँक्रीट व डांबरी रस्त्याच्या कामाच्या निविदा (टेंडर) प्रक्रिया पार पडली आहे. या तिनही कामासाठी सुमारे 135 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

खडकवासला - शहरातून बाहेर पडणारे रस्ते यामध्ये नांदेड ते वेल्हे, खानापूर ते पानशेत व सिंहगड ते खेड- शिवापूर ही कामे सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्लूडी)च्या वतीने मंजूर केली आहेत. या मार्गावरील रस्ता व पुलाच्या रुंदीकरणासह काँक्रीट व डांबरी रस्त्याच्या कामाच्या निविदा (टेंडर) प्रक्रिया पार पडली आहे. या तिनही कामासाठी सुमारे 135 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

या सर्व रस्त्यांची कामे पावसाळ्यात किंवा त्यानंतर सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मंजूर सर्व रस्ते खडकवासला मतदार संघातील असून, त्यासाठी आमदार भीमराव तापकीर यांनी त्यासाठी विशेष पाठपुरावा केला. मतदार संघातील रस्ते, पूल रुंद करणे, रस्ते अधिक टिकाऊ करण्यासाठी विशेष निधी मिळविला आहे. या रस्त्याच्या कामासाठीचा निधी ऍन्युइटी पद्धतीने दिला जाणार आहे. या योजनेत हे सर्व रस्ते सुमारे 10 मीटर (33फूट) होणार आहे. तर हे सर्व पूल 12 मीटरचे (40 फूट) असतील. काही ठिकाणी काँक्रीट रस्ते त्या रस्त्यालगत काँक्रीट गटारे केली जाणार आहेत. 

रस्त्याचे नाव नांदेड ते वेल्हे
(पालिका हद्दी नंतर, खडकवासला, खानापूर, पाबे घाट मार्गे वेल्हे)
एकूण लांबी 34 किलोमीटर
राज्य महामार्ग क्रमांक 133- अपेक्षित खर्च- सुमारे 65 कोटी रस्ता 
रस्त्याची वैशिष्ट्ये 
अ) सर्व पूल 12 मीटर रुंदीच्या रूंदीत वाढविणे 
ब) किरकटवाडी, कोल्हेवाडी, खडकवासला आणि खानापूर येथे 10 मीटर रूंद कॉंक्रीट रस्ता 
क) नांदेड ते किरकटवाडी फाटा 4 पदरी  
ड) 16 मीटर( 54 फूट) काँक्रीट रस्ता
इ) एक फुटांचा दुभाजक दोन्ही बाजूला 7 मीटरचा रस्ता
फ) एकूण काँक्रीट रस्ता रोड - 10.1 किमी 
ग) सर्व गावांमध्ये बांधलेली काँक्रीट गटारे
ह) उर्वरीत लांबी 10मीटर रुंद डांबरी रस्ता

खानापूर ते पानशेत
(मालखेड, वरदाडे फाटा, निगडे फाटा, ओसाड फाटा, सोनापूर, आंबी फाटा, पानशेत, एमटीडीसी हॉटेल बाजी पासलकर पुतळा)
एकूण लांबी 16.47 किलोमीटर (पानशेत एमटीडीसी)
प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक- 37- अपेक्षित खर्च- 35 कोटी रुपये 
अ) संपूर्ण लांबी दरम्यान 7 मीटर रूंद डांबरी रस्ता
ब) पानशेतमध्ये 9 मीटर रूंद रस्ते 
क) सर्व पूल 12 मीटर रुंदीच्या रूंदीकरण 
ड) पानशेत येथील शेवटच्या टप्प्यातील 150 मीटर रस्ता काँक्रीट 

सिंहगड- कोंढणपूर- खेड शिवापूर
(सिंहगड घाट रस्ता, वाघोबाची दरी, कोंढणपूर फाटा, अवसरवाडी, कोंढणपूर, ते शिवापूर राष्ट्रीय महामार्ग चार पर्यंत) 
प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक- 36
एकूण आठ किलोमीटर लांबी (सात मीटर रुंद) - अपेक्षित खर्च- 35 कोटी रुपये 
रस्त्याची वैशिष्ट्ये
अ) सर्व गावांमध्ये 7 मीटर रुंदीचा काँक्रीट रस्ता 
ब) काँक्रीट रस्त्याची लांबी 3.24 किलोमीटर
क) सर्व पूल 12 मीटर रुंदीच्या रूंदीकरण
ड) सर्व गावांमध्ये बांधलेली काँक्रीट गटारे 

सर्वात जास्त निधी खडकवासल्याला
खडकवासला मतदार संघात गेल्या वर्षी सर्वात जास्त म्हणजे सुमारे 26 कोटी रुपयांचा सर्वात जास्त निधी मिळाला होता. यंदा देखील एका वर्षात आता पर्यंतचा सर्वात जास्त निधी म्हणजे 135 कोटी निधी मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री गिरीष बापट यांच्यामुळे हा जास्तीचा निधी मिळाला आहे. 
भीमराव तापकीर, आमदार खडकवासला

Web Title: marathi news pune news khadakwasla roads development