अखेर शिवणे कोंढवे रस्त्याचे आज भूमिपूजन

राजेंद्रकृष्ण कापसे
बुधवार, 6 डिसेंबर 2017

असा होणार रस्ता
शिवणे येथील शिंदे पुलापासून कोंढवे धावडे येथील अंजनी गार्डन(दहा नंबर) पर्यंत हा रस्ता साडेचार किलोमीटर चा आहे. हा पूर्ण रस्ता काँक्रिट मधून होणार आहे. या पुलाची रुंदी 10 मीटर असणार आहे. यातील 7 मीटर रस्ता काँक्रीट व दोन्ही बाजूला प्रत्येकी दीड दीड मीटरचे ब्लॉक बसविण्यात येणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी सांगितले. 

खडकवासला : अडीच वर्षांपासून रस्त्याला खड्डे पडलेले... मागील वर्षी 5कोटी निधी मिळाला. परंतु दुरुस्तीचा निधी असल्याने निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही... त्यात यंदा 105 टक्के पाऊस झाला. परिणामी खड्डे दुपटीने वाढले. नागरिक खड्ड्यांना वैतागलेले... दहा कोटींचा निधी मंजूर झाला.  आता लवकर काम सुरू होईल. असे वाटत असताना त्या निविदा प्रक्रियेत तीन ऐवजी दोनच निविदा आल्या...फेर निविदा काढल्यानंतर... अखेर भूमीपूजनाचा मार्ग मोकळा झाला. 

 शिवणे ते कोंढवे धावडे या साडेचार किलोमीटर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामासाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले असून त्याचे उद्या बुधवारी सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते व आमदार भीमराव तापकीर याच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.

हे काम राज्य सरकारच्या 2017- 18च्या अंदाजपत्रकात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांतून हा निधी मंजूर झाला आहे. असे सांगून आमदार भीमराव तापकीर म्हणाले "डांबरीकरणासाठी मागील वर्षी एक कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यातून रस्ता झाला होता. उर्वरित रस्त्यासाठी दुरुस्तीच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मागील वर्षी पाच कोटी रुपये जादा मंजूर केले होते. परंतु टेंडर न भरल्यामुळे ते काम झाले नव्हते. यंदा पावसाळ्यात मुरूम तीन वेळा टाकला होता. पावसाळा संपताच 31 ऑक्टोबर रोजी पॅचवर्क करून घेतले."

दरम्यान, मागील दोन वर्षेपासून हा रस्ता खराब झाला होता. यंदा तर मोठया प्रमाणात खड्डे पडले होते. नागरिकांची मोठी नाराजी झाली होती. शिवसेनेने व स्थानिक नागरिकांच्या वतीने जनसेवा स्वयंसहायता बचतगटाच्या माध्यमातून काढलेल्या मोर्च्यात खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाले होते. 

असा होणार रस्ता
शिवणे येथील शिंदे पुलापासून कोंढवे धावडे येथील अंजनी गार्डन(दहा नंबर) पर्यंत हा रस्ता साडेचार किलोमीटर चा आहे. हा पूर्ण रस्ता काँक्रिट मधून होणार आहे. या पुलाची रुंदी 10 मीटर असणार आहे. यातील 7 मीटर रस्ता काँक्रीट व दोन्ही बाजूला प्रत्येकी दीड दीड मीटरचे ब्लॉक बसविण्यात येणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी सांगितले. 

Web Title: marathi news pune news kondhwe-shivne road work starts today