चितपट निकाली कुस्त्यांनी गाजला धामणीचा आखाडा 

सुदाम बिडकर
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

पारगाव (पुणे) : धामणी (ता. आंबेगाव) येथील श्री म्हाळसाकांत खंडोबा देवाची यात्रा उत्साहात पार पडली यात्रेच्या दुसऱ्या दिवशीही परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कुस्त्यांच्या आखाड्यात सातारा, सांगली, जालना, अहमदनगर व संपूर्ण पुणे जिल्ह्यातून आलेल्या मल्लांच्या लढती लक्षवेधी ठरल्या विजेत्या पहीलवांना एकूण 50 हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली शेवटची कुस्ती 11 हजार रुपयांची झाली. 

उत्तर पुणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील खंडोबा देवाच्या यात्रेला बुधवार (दि. 31) पासून उत्साहात सुरुवात झाली. काल गुरुवारी सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पारंपारिक पध्दतीने देवाच्या काठीच्या मिरवणुक काढण्यात आल्यानंतर त्या मंदिराच्या शिखराला लावण्यात आल्या. सकाळी 8 ते 11 कलगी तुऱ्याचा कार्यक्रम झाला. यावेळी धामणी, लोणी, शिरदाळे, पहाडदरा, ज्ञानेश्वरवस्ती परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

दुपारी कुस्त्यांच्या आखाड्यात सातारा, सांगली, जालना, अहमदनगर व संपूर्ण पुणे जिल्ह्यातील देहु, शिक्रापुर, मुळशी, मावळ, शिरुर व पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील तालमीमधील मल्लांनी चमकदार खेळी करुन चितपट कुस्त्या केल्या. एकलव्य तालीम संघाच्या ओंकार हिंगे याने केलेल्या चितपट कुस्तीने सर्वांची वाहवा मिळवली. 

निकाली कुस्ती करणाऱ्या पहिलवानास 51 रुपयांपासून 11 हजार रुपयांपर्यंत बक्षिसे देण्यात आली. एकुण सुमारे 50 हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली. शेवटची 11 हजार रुपयांची कुस्ती राज्यस्तरीय कुमार कुस्ती स्पर्धेतील कांस्यपदक विजेता निखील मच्छिंद्र वाघ (पहाडदरा) व प्रज्वल हिंगे (एकलव्य तालिम संघ अवसरी बुद्रुक) या दोघात झाली पंचांनी ती बरोबरीत सोडवली. आखाड्याची व्यवस्था यात्रा समितीचे अध्यक्ष गजाराम पाटील जाधव, पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, सरपंच सागर जाधव, वामनराव जाधव, आनंदा जाधव, वसंतराव जाधव, अंकुश भुमकर, लक्ष्मणराव काचोळे, शांताराम जाधव, बाबाजी गाढवे, भगवान वाघ, माजी सरपंच सुनिल जाधव आदींनी पाहीली. पंच म्हणुन पहीलवान गोरक्ष सासवडे व दिनकर भुमकर यांनी काम पाहीले. 

Web Title: Marathi news pune news kusti