पुणे - बांधकामावरून पडल्याने मजुराचा मृत्यू

संदीप घिसे 
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

पिंपरी (पुणे) : पाण्याच्या टाकीला प्लास्टर करीत असताना तोल जाऊन पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी पिंपरी येथे घडली. कचरू डोंगरे (वय 55, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे.

पिंपरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मधुसूदन घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे सभागृहाच्या पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. या टाकीला प्लास्टर करण्यासाठी लाकडाची पराती बांधण्यात आली आहे. या परातीवरून चार फूट उंचीवरून तोल जाऊन पडल्याने डोंगरे हे बेशुद्ध पडले. त्यांना त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. मृत्यूचे कारण समजू शकले नाही. पिंपरी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Marathi news pune news labour fallen from building dies