वादविवादातील जमिनींचे एजंट, सावकार, गुंडांवर पोलीसांची नजर

Vishwas-Nangare-Patil
Vishwas-Nangare-Patil

सासवड (पुणे) : न्यायप्रविष्ट दाव्यातील व वादातील जमिनी कवडीमोलाने बळकाविणारे व गरीबांना फसवणारे जमिनींचे एजंट, सावकारीत समाजाची गळचेपी करणारी प्रवृत्ती, गुंडागर्दी करणारे व बेकायदेशीर व्यवहारातील लोक आपल्या नजरेतून चुकणार नाहीत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तक्रारी येऊद्या. ही किड काढून टाकली जाईल, प्रसंगी त्यांना `मोका` लावू, असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सासवड येथे दिला.    

सासवड (ता. पुरंदर) येथील पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी नांगरे पाटील यांनी केली. या निमित्ताने भोर उपविभागातील सासवड, जेजुरी, वेल्हे, भोर, राजगड या पोलीस ठाण्यांतर्गतच्या पोलीस पाटील, सरपंच, प्रतिष्ठीत नागरीकांची बैठक सासवडच्या संभाजी सभागृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक, भोरचे पोलीस उप अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, राजगडचे पोलीस उप निरीक्षक तलभार, भोरचे पोलीस उप निरीक्षक तडाखे आदी उपस्थित होते. तर प्रतिष्ठीत नागरीकांमध्ये ख्वाजाभाई बागवान, संतोष जगताप, दत्ता चव्हाण, दक्षता समिती सदस्या कुमुदिनी पांढरे, प्रिया पावशे आदी उपस्थित होते.  

पुणे, कोल्हापूरसह पाचही जिल्ह्यात नगरपालिका क्षेत्रात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र या क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात गावनिहाय दोन सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत व सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सूचना करणार आहे., असे सांगून श्री. नांगरे पाटील म्हणाले., माझ्या क्षेत्रात कुठेही रस्त्यावर डिजे वाजणार नाही. रस्त्यावर कोणी वाढदिवस साजरा करणार नाही, उगीचच फटाके वाजविणार नाही. असे आढळून आले तर तिथल्या प्रभारी अधिकाऱयांनी तिथेच तत्काळ कडक कारवाई करावी. रोज या भागात दहा बळी रस्ते अपघातात जातात. त्यामुळे जिथे वाहनांवर कारवाई गरजेची आहे, तिथे संबंधीत खाते वा ठेकेदारांवरही कारवाई केली जाईल. यावेळी प्रास्ताविक पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी केले. सुवेझ हक यांनीही काही प्रश्नांना उत्तरे दिली. 

पोलीस पाटील यांना शस्त्र परवाना दिला जाईल. मात्र बंदुका वा तत्सम शस्त्रे त्यांनी घ्यावयची आहेत. निर्भया पथक, बीट मार्शल, दामिनी पथक, पोलीसांची रात्रीची गस्त, ग्राम सुरक्षा दल कोठे फिरताना दिसत नसेल. तर मला वा वरीष्ठांना कळवा, असेही विश्वास नांगरे पाटील यांनी बैठकीत सांगितले.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com