पतंगराव कदम यांच्या अंत्यदर्शनासाठी नागरिकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

पतंगराव कदम (वय 72) यांचे शुक्रवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. पोटविकाराने ते आजारी होते. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचे पार्थिव आज (शनिवार) सकाळी पुण्यात आणण्यात आले. त्यांच्या सिंहगड या निवासस्थानी पार्थिव आणण्यात आल्यानंतर सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली.

पुणे : काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यांच्या सिंहगड या निवासस्थानी राजकीय नेते व कार्यकर्ते जमा झाले होते. तर, भारती विद्यापीठातही नागरिकांची प्रचंड गर्दी होती.

पतंगराव कदम (वय 72) यांचे शुक्रवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. पोटविकाराने ते आजारी होते. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचे पार्थिव आज (शनिवार) सकाळी पुण्यात आणण्यात आले. त्यांच्या सिंहगड या निवासस्थानी पार्थिव आणण्यात आल्यानंतर सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, देवीसिंह शेखावत, उज्ज्वला वैद्य, प्रणिती शिंदे, कुमार सप्तर्षी, विक्रम बोके, सुधीर गाडगीळ, पी ए इनामदार, प्रभाकर देशमुख, विरेंद्र किराड, दिप्ती चवधरी, श्रीरंग बारणे, मुरलीधर मोहोळ, सुरेश कलमाडी, शां.ब.मुजुमदार, विश्वनाथ कराड, अनिल शिरोळे, अभय छाजेड, निलेश निकम, विकास पासलकर, विश्वंभर चौधरी, नितीन करमळकर, बुधाजीराव मुळीक आदींनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढत पार्थिव भारती विद्यापीठात नेण्यात आले. त्याठिकाणी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. 

सांगली जिल्ह्यातील कडेगाव या मूळ गावी आज सायंकाळी चार वाजता कदम यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू करणाऱ्या कदम यांनी राजकरणात स्वत:चा ठसा उमटवलाच; शिवाय भारती विद्यापीठसारखी शिक्षण संस्थाही उभारली. कदम यांच्यावर काही दिवसांपासून लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांना उपचारांसाठी अमेरिकेत घेऊन जाण्याचाही विचार होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.

Web Title: Marathi news Pune news last journey of Patangrao Kadam