आ. लक्ष्मण जगतापांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांचे भूमिपुजन

रमेश मोरे 
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

पुणे : चिंचवड विधानसभेचे आमदार तथा पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आ.लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त जुनी सांगवी प्रभाग क्र. 32 मधे विविध विकासकामांचे भुमिपुजन करण्यात आले. येथील माहेश्वरी चौक ते साई चौक जाँगिंग ट्रँक, मुळानगर रोडचे काँक्रीटीकरण, अभिनवनगर रोड काँक्रीटीकरण या सोबत जुन्या सेवा वाहिन्या, पावसाळी गटारांची पाईपलाईन, नविन पदपथ करण्यात येणार असून सुमारे एक हजार मीटर अंतराच्या या विकास कामांचे विद्यमान नगरसेवकांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले.

यात जुन्या वाहिन्या बदलुन मोठ्या व्यासाच्या वाहिन्या टाकण्यात येणार असुन लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात येईल असे स्थापत्य विभागाकडून सांगण्यात आले. यावेळी विद्यमान नगरसेवक हर्षल ढोरे व संतोष कांबळे म्हणाले पावसाळ्यात या सर्व ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार होत होते. नविन मोठ्या व्यासाच्या वाहिन्या टाकल्यावर या भागातील प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागेल. जेष्ठ नगरसेविका माई ढोरे म्हणाल्या, सर्व विकासकामे लवकरात लकवर पूर्ण करून घेण्यासाठी लक्ष देणार आहे. मात्र विकासकामे करताना नागरीकांनीही सहकार्य करावे. यावेळी नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेविका माई ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे, नगरसेविका शारदा सोनवणे, मनोहर ढोरे, भाई सोनवणे स्थापत्य विभागाचे पोरेड्डी साहेब व ईतर पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Marathi news pune news laxman jagtap birthday development work