सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इतिहास विभागाकडून राज्यस्तरीय चर्चासत्र

संदिप जगदाळे
शनिवार, 10 मार्च 2018

हडपसर (पुणे) : कर्मवीर भाऊराव पाटील यांचे सामाजिक आणि शैक्षणिक विचार सर्वसामान्यापर्यंत पोहचविणे काळाची गरज आहे. तसेच त्यांचे दूरदृष्टी असणारे विचार समाजात रुजतील अशी शैक्षणिक धोरणे राबविणे आवश्यक आहे, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील यांचे सामाजिक योगदान आणि शिक्षणातील नवे प्रवाह याय विषयावर आयोजीत राज्यस्तरीय चर्चासत्रात मार्गदर्शन करताना कोत्तापल्ले बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे होते. प्रसंगी प्राचार्य डॉ .अरविंद बुरुंगले, चर्चासत्राचे समन्वयक प्रा. देवकाते, नम्रता मेस्त्री,  डॉ. एम .आर डॉ. प्रभंजन चव्हाण,  डॉ एम. आर .जरे, डॉ एम .एल. डोंगरे , प्रा. डी .डी .गायकवाड, जी. के घोडके जी. के, प्रा एम आर, डॉ  बेबी खिलारे, बी. ए. गायकवााड, प्रा आर. बी. काळे आर, प्रा. डॉ संजय चव्हाण, प्रा.डॉ. अशोक धुमाळ, शिल्पा शितोळे, डॉ. विश्वास देशमुख, शरद पासले, प्रा डॉ. व्ही. डी पाटील, डॉ.कैलास रोडगे, उपस्थित होते. 

कोत्तापल्ले म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखी दूरदृष्टी असणारे विचार समाजात रुजतील अशी शैक्षणिक धोरणे राबविणे आवश्यक आहे. स्त्रियांनी शैक्षणिक क्रांती करावी यासाठी सर्वसमावेशक शैक्षणिक विचारधारा निर्माण व्हावी. बुद्धीला धार येण्यासाठी प्रत्येकाने सामर्थ्यशाली विचारसरणी ठेवली पाहिजे. शिक्षणाचा हक्क हिरावून घेणारी धोरणे शासनाने राबवू नयेत. बुद्धीचा वापर प्रत्येकाचा विकास करण्यासाठी आहे. हे शासनाच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणामुळे कमी होऊ लागले आहे. 

प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे म्हणाले, रयत शिक्षण संस्थेने स्वतःची संस्कृती जोपासली आहे. रयत शिक्षण संस्थेचे कार्य समाजातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले आहे. सामाजिक आणिक सांस्कृतिक क्षेत्रात रयतची उंच भरारी आहे. नवीन आधुनिक जगाबरोबर रयत शिक्षण संस्थचे प्रगती सुरू आहे. 

प्रा, विजय काकडे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील आणि ज्ञानरचना वाद याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रामध्ये डॉ. एकनाथ ढोणे यांनी कर्मविरांचे शैक्षणिक कार्य व आजची शैक्षणिक आव्हाने याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी महात्मा फुले महाविद्यालयातील पनवेल इतिहास विभाग इतिहास विभाग प्रमुख मा, डॉ. भानुदास शिंदे, डॉ. विजय खरे विद्यार्थ्याना तसेच संशोधकांना मार्गदर्शन केले

Web Title: Marathi news pune news lecture discussion