लेण्याद्रीला फुले दाम्पत्य सन्मान सोहळा

दत्ता म्हसकर
मंगळवार, 2 जानेवारी 2018

डॉ. सुषमा अंधारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला क्रांतीसूर्य जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रबाई फुले यांच्या प्रतिमांचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. १ जानेवारी १८४८ साली फुले दांपत्याने पहीली मुलींची शाळा सुरू केली या घटनेचे स्मरण करून हा कार्यक्रम गेल्या चार वर्षांपासून घेत  असल्याचे मंचाचे कार्याध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

जुन्नर : जुन्नर तालुका महात्मा फुले विचार मंच जुन्नरच्या वतीने लेण्याद्री (ता.जुन्नर) येथे सोमवारी (1 जानेवारी) सायंकाळी फुले दाम्पत्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी तोरणा रायगड न्यास संस्था पुणेचे शिला रमेश आंबेकर दाम्पत्य होते.  

डॉ. सुषमा अंधारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला क्रांतीसूर्य जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रबाई फुले यांच्या प्रतिमांचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. १ जानेवारी १८४८ साली फुले दांपत्याने पहीली मुलींची शाळा सुरू केली या घटनेचे स्मरण करून हा कार्यक्रम गेल्या चार वर्षांपासून घेत  असल्याचे मंचाचे कार्याध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. यावेळी तालुक्यात विवीध क्षेत्रात सामाजिक जाणिवेतून काम करणाऱ्या दहा दाम्पत्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये श्री. व सौ. डॉ.सविता संजय रहांगडाले,  श्री. व सौ. नम्रता मनोज हडवळे, श्री. व सौ. पल्लवी गणेश हांडे,  श्री. व सौ. डॉ. सुनिता संजय वेताळ,  श्री. व सौ. कविता शशिकांत जाधव,  श्री. व सौ. माधुरी दत्तात्रय म्हसकर, श्री. व सौ. अश्विनी विकास घोगरे, श्री. व सौ. डॉ. अनुष्का प्रविन शिंदे,  श्री. व सौ. ज्योती दिपक काशीद, श्री. व सौ. मालती सुरेश गायकवाड  या दाम्पत्यांचा सन्मानपत्र, महावस्त्र, साडी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. 

यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर सुषमा अंधारे यांनी जातीयवाद , स्त्री मुक्ती , अनिष्ट रूढी परंपरा , समाजवाद या विषयांना स्पर्श करत विज्ञान वादाची कास धरावी असे आवाहन उपस्थितांना केले तसेच दांपत्याचा सन्मान सोहळा हा अभिनव उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. वैयक्तिक सन्मान खूप होतात परंतू जे पती पत्नी दोघेही समाजासाठी काम करतात त्यांचा सन्मान हा खरोखरच एक आदर्श  असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी उपस्थिता मधून लकी ड्रॉ पध्दतीने एका भाग्यवान फुले दांपत्याची निवड करण्यात आली व श्री व सौ रूपाली रत्नाकर डोके हे भाग्यवान दाम्पत्य ठरले. यावेळी विचार मंचाचे अध्यक्ष प्रा. डी. एल. म्हस्के, लेण्याद्री देवस्थान चे अध्यक्ष गोविंद मेहेर, जयवंत डोके, मच्छिंद्र शेटे, संजय ढेकणे, प्रकाश ताजणे, तुषार थोरात, बाळासाहेब विधाटे, राजेश बिडवई, काशिनाथ लोखंडे, योगेश डोके, संतोष सहाणे, डिसेंन्ट फाऊंडेशन चे  महेंद्र बिडवई, योगेश धर्मे, मंगेश डोके आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचलन  सुनीता वामन यांनी केले तर आभार पल्लवी डोके यांनी मानले.

Web Title: Marathi news pune news lenyadri