सुपेवाडीतील बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

राजेंद्र लोथे
शनिवार, 10 मार्च 2018

काळूराम श्रीपती सुपे यांच्या घराच्या पढवित बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने आज हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन शेळ्या ठार झाल्या असून, वन विभागाकडून घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला.

चास : वाडा गावची सुपेवडी (ता. खेड) येथे शनिवार (ता. 10) पहाटे काळूराम श्रीपती सुपे यांच्या घराच्या पढवित बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या. विशेष म्हणजे एक शेळी गाभण असून, दुसरी शेळी घरापासून तब्बल 300 ते 400 मीटर पाठलाग करून फडश्या पाडला. 

काळूराम श्रीपती सुपे यांच्या घराच्या पढवित बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने आज हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन शेळ्या ठार झाल्या असून, वन विभागाकडून घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला. या घटनेनंतर नागरिकांनी खबरदारी घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. 

Web Title: Marathi News Pune News Leopard Attacked 2 ships died