बिबट्या आता ऊसाच्या नव्हे, तर कांद्याच्या शेतात..

दत्ता म्हसकर
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

जुन्नर (पुणे) : जुन्नरला उसाच्या शेतातून दिवसाढवळ्या आढळणारा बिबट्या, ऊसतोड झाल्याने आता कांदा लागवड केलेल्या शेतात देखील दिसू लागला आहे.

शिरोली बुद्रुक ता.जुन्नर येथे बिबट मानव सहजीवन पहावयास मिळाले आहे. कांद्याच्या एका शेतात एक महिला काम करत आहे. तर जवळच्या शेतातील कांद्यात बिबट्या आरामशीर बसला असल्याचे येथील शेतकरी संजय सीताराम थोरवे यांच्या शेतात काल (ता.16) सायंकाळी दिसून आले.

थोरवे यांचा मुलगा आदेश याने या बिबट्याची 15 ते 20 फुटावरून छायाचित्रे देखील घेतली. शिरोली बुद्रुक परिसरात ऊसशेती मोठ्या प्रमाणात आहे, साहजिक येथे बिबट्याची संख्या देखील अधीक आहे. शेतकऱ्यांना बिबट्याच्या वावरामुळे दिवसा शेतात काम करणे धोकादायक झाले आहे. या परिसरात बिबट्याची दहशत कायम असून मेंढपाळाच्या मेंढ्यावर देखील हल्ला करून मेंढ्या ठार मारल्या मात्र त्यांना वन विभागाकडून नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. तर या परिसरातले बिबटे पिंजऱ्यात जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 

Web Title: Marathi news pune news leopard field farm