लोकलसह 10 रेल्वे गाड्या शनिवारी व रविवारी रद्द 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

पुणे - पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक तीन व चारदरम्यान गर्डर टाकण्याचे काम शनिवार ( ता. 24 मार्च) आणि रविवारी (ता. 25) सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच दरम्यान होणार आहे. त्यामुळे लोकलसह 10 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सहा गाड्यांच्या मार्गात बदल केला आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. 

रद्द केलेल्या गाड्या पुढील प्रमाणे -
पुणे- लोणावळा (स. 5. 45)
लोणावळा- पुणे (स. 7. 25)
पुणे- दौंड डेमू (स. 10.32)
पुणे- कर्जत पॅसेंजर (स. 11. 15)
पुणे- लोणावळा (दु. 12. 15)
बारामती- पुणे पॅसेंजर (दु. 12.10) ही गाडी दौंड- पुणे दरम्यान रद्द होईल.
पुणे- निजामाबाद पॅसेंजर (दु. 2. 25) ही गाडी पुणे-दौंड दरम्यान रद्द होईल. लोणावळा-पुणे (दु. 2. 50)
कर्जत - पुणे पॅसेंजर (दु. 3. 10)

Web Title: marathi news pune news local and train cancel at saturday sunday