पुणे - 13 दुचाकी चोरी प्रकरणी तिघांना अटक

जनार्दन दांडगे
मंगळवार, 13 मार्च 2018

लोणी काळभोर (पुणे) : पुणे शहर व जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून मागील काही दिवसांत चोरीला गेलेल्या १३ दुचाकींच्या चोरी प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये योगेश उर्फ टाकल्या नवनाथ वजळे (वय - १९, रा. घोरपडे वस्ती, लोणी स्टेशन, ता. हवेली), गणेश विजय चिकाटे (वय - २०, रा. रायवाडी रोड, लोणी काळभोर, ता. हवेली) व सुरज आनंत जाधव (वय - १९, रा. परळी वैजनाथ, ता. जि. बीड) यांचा समावेश असून त्यांच्याकडून सुमारे १० लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोंडूभैरी यांनी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी स्टेशन परिसरातून नारायण शंकर व्यास (वय - २५, मुळ रा. रेणेवास, ता. कोठारी, भिलभरा, राजस्थान) यांची दुचाकी २६ फेब्रुवारी २०१८ रोजी रात्री घराच्या पार्किंगमधून चोरीला गेली होती. दरम्यान मंगळवारी (ता. १३) लोणी काळभोर पोलिसांना या गुन्ह्यातील दुचाकी योगेश वजळेकडे असल्याची खात्रीलायक माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यास अटक केली तसेच त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, पुणे शहरातून चोरलेल्या दोन दुचाकी हस्तगत केल्या. तसेच कवडीपाट टोलनाका येथून बुधवार (ता. ७) रात्री ११ ते गुरुवार (ता. ८) सकाळी ७ या वेळेत दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार नवनाथ श्रीराम पासलकर (रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिसांत दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी गणेश चिकाटे व सुरज जाधव यांना अटक करून त्यांच्याकडून सदरच्या गुन्ह्यातील दुचाकी हस्तगत करण्यात आली होती. दरम्यान त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता पुणे शहरातून चोरलेल्या ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या.

लोणी काळभोर पोलिसांनी जप्त केलेल्या १० लाख ५० हजार रुपये किमतीच्या १३ दुचाकिंमध्ये ३ बजाज पल्सार, ३ होंडा यूनिकॉर्न, २ होंडा पॅशन प्रो, ३ हिरो होंडा स्प्लेंडर व २ एक्टिवा या गाड्यांचा समावेश आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश ढवाण, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलिस हवालदार रॉकी देवकाते, समीर चमन शेख, परशुराम सांगळे, सागर कडू, अभिमान कोळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
 
Web Title: Marathi news pune news loni kalbhor bikes theft