पुणे-लोणी काळभोर परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी

Loni-Kalbhor
Loni-Kalbhor

लोणी काळभोर (पुणे) : पूर्व हवेलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये लोणी काळभोर, उरुळी कांचन, थेऊर, कुंजीरवाडी, शिंदवणे या गावांच्या ठिकाणी जयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन, मिरवणूक तसेच परिसरातील शाळांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रम घेण्यात आले.

उरुळी कांचन येथील ग्रामपंचायतीमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य काळूराम मेमाणे, माजी उपसरपंच युवराज कांचन, ग्रामपंचायत सदस्य संतोष कांचन, सागर कांचन व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. तसेच बगाडे वस्ती येथे जय भवानी मित्र मंडळाच्या सदस्यांनी शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कांचन, सुभाष बगाडे उपस्थित होते. येथील आश्रम रस्ता परिसरातील लहानगटाच्या किलबिल शाळेमधील मुलांनी पारंपारिक वेशभूषा करून शिक्षकांसह गावातून प्रभातफेरी काढली. यावेळी ग्रामपंचायत सदस्या सारिका मुरकुटे उपस्थित होती. लोणी काळभोर (ता. हवेली) येथे अंबरनाथ लोकसेवा प्रतिष्ठानने किल्ले सिंहगड येथून ज्योत आणून गावातील शिवशक्ती चौक येथे शिवजयंती साजरी केली. यामध्ये ज्योत आणण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र वलटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली. 

शिंदवणे (त. हवेली) येथील शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. दरम्यान किल्ले पुरंदर येथून ज्योत आणण्यासाठी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी मेहनत घेतली. यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष मुकेश महाडिक, पोलिस पाटील पोपट महाडिक, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष जगदीश महाडिक, भाऊसाहेब महाडिक, शिवाजी महाडिक, बाबुराव महाडिक उपस्थित होते.

थेऊर (ता. हवेली) येथील तारमळा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिवजयंतीनिमित्त राजांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये बाल शिवाजी, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, मावळे व महिला यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी ग्रामस्थांनी देखील पालखीतील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून 'माझी शाळा - माझा फळा' या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांसाठी फलक लावण्यात आले. यावेळी मुलांनी फलकांवर शिवाजी महाराजांविषयी माहिती, कविता व चित्रे रेखाटली. यावेळी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com