जागा देता का जागा?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

पुणे - ‘महामेट्रो’चे जंक्‍शन उभारण्यासाठी शिवाजीनगर शासकीय गोदामाची जागा हस्तांतर करण्याची तांत्रिक प्रक्रिया प्रशासकीय स्तरावर पूर्ण झाली; परंतु प्रत्यक्ष ताबा देण्यापूर्वी पर्यायी जागा मिळण्यामध्ये अडचणी येत आहेत. 

धान्य गोदामांसाठी भारतीय खाद्य निगमच्या गोदामांबाबत दिल्लीतून अंतिम मंजुरी मिळत नसल्यामुळे ‘महामेट्रो’कडून वखार महामंडळाच्या गोदामांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनापुढे ठेवण्यात आला आहे. 

शिवाजीनगर शासकीय गोदामाच्या हस्तांतर प्रक्रियेदरम्यान जिल्हा प्रशासनाच्या कार्यालये व गोदामांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या कार्यालये व गोदामांचे भाडे देण्याचे ‘महामेट्रो’कडून कबूल करण्यात आले; परंतु पर्यायी जागा मिळण्यामध्ये अडचणी येत असल्यामुळे; तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून जास्त भाडे आकारण्यात येत असल्यामुळे अडचणींमध्ये भर पडत आहे.

या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे म्हणाले, ‘‘शासकीय गोदामांमध्ये परिमंडल कार्यालये, सेतू आणि धान्य गोदामांच्या स्थलांतरापूर्वी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांकडून अनुक्रमे हडपसर व भोसरी येथील क्षेत्रीय कार्यालयांची जागा देण्यास परवानगी मिळाली आहे; तसेच पुणे स्टेशन येथील एसटी महामंडळाच्या इमारतीतील पहिला मजला हस्तांतर करण्यास प्रशासकीय पातळीवर मंजुरी मिळाली आहे. भोसरी येथील जागेचे भाडे दहा लाख रुपये प्रतिमहिना असल्यामुळे ‘महामेट्रो’कडून त्यापेक्षा स्वस्त जागा घेण्याचे सुचविण्यात आले आहे. जोपर्यंत पर्यायी जागा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत शिवाजीनगर गोदामाची जागा महामेट्रोला ताब्यात दिली जाणार नाही.’’

एसटी स्थानकाच्या इमारतीत सेतू कार्यालय
निवडणूक साहित्य व परिमंडल कार्यालयासाठी भोसरी येथील जागा निश्‍चित करण्यात आली आहे; तर पुणे स्टेशन येथील एसटी बस स्थानकाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सेतू व परिमंडल कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये धान्य गोदाम सुरू करण्याचे नियोजित असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pune news mahametro place