महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन

मिलिंद संधान
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

नवी सांगवी (पुणे) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने रविवारी (ता. 18) भोसरी येथील रामस्मृती लॉन्स मध्ये 12 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे एकदिवसीय अधिवेशन दोन सत्रात घेण्यात येणार असून यावेळी विविध कार्यक्रम व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

नवी सांगवी (पुणे) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने रविवारी (ता. 18) भोसरी येथील रामस्मृती लॉन्स मध्ये 12 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे एकदिवसीय अधिवेशन दोन सत्रात घेण्यात येणार असून यावेळी विविध कार्यक्रम व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी 10 वाजता जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांचे हस्ते होईल. स्वागताध्यक्ष म्हणून पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे आहेत तर  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने राहतील. प्रमुख अतिथी म्हणून दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पत्रकार संघाचे संघटक संजयजी भोकरे, प्रदेश कार्याध्यक्ष वसंतराव मुंढे, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक प्रमुख मुंबईचे रणधिर कांबळे, वृत्तवाहिनी विभाग प्रमुख मनिष केत यांची उपस्थिती राहणार आहे. 

अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात सकाळी 11 वाजता ' माध्यमांचे बदलते स्वरुप ' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अशोकराव सोनवणे, तुळशिदास भोईटे, मंदार फणसे, पुरुषोत्तम सांगळे, विजय बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.  

दुपारच्या सत्रात 3 वाजता राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असून मुरलीधर शिंगाटे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी विजय दर्डा यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजीव खांडेकर भूषवणार आहेत यावेळी दिंडोरीचे चंद्रकांतदादा मोरे, कृ. उ. बा.स. पुणे प्रशासक बी. जे. देशमुख यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी परिवहन राज्यमंत्री दिवाकर राते, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे प्रमुख पाहूणे म्हणून जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार लक्ष्मण जगताप, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार शिवाजीराव पाटील, अमर साबळे, श्रीरंग बारणे, गौतम चाबुकस्वार, कुंदन ढाके आदी उपस्थित राहणार आहेत.

सदर 12 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाला  बहूसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने, संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे, आदींसह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.

Web Title: Marathi news pune news maharashtra rajya marathi patrakar sangh