पुणे : माहेश्वरी चौकात महाशिवरात्री उत्साहात  

मिलिंद संधान
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

नवी सांगवी ( पुणे ) : येथील माहेश्वरी (इंद्रप्रस्थनगरी) चौकात व्यापारी बंधूच्या वतीने महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने रस्त्याच्या मधोमध वाहतुक बेट म्हणून भगवान शंकर यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. 

परंतु हे वाहतुक बेट आता भाविकांचे श्रध्दा स्थान झाले आहे. येथील स्थानिक व्यापारी दत्तात्रेय भोसले, नथुराम ढोकळे, लक्ष्मण मुळे, संभाजी मंडलिक, मुश्तकीन अन्सारी, सुनिल महतो यांनी विधिवत मुर्तीची पुजा करुन भाविकांकरीता खिचडी, केळी व मठ्याच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते. 

वाहनचालकांना शिस्त लागावी या उद्देशाने वाहतुक बेट चौकाचौकात उभारण्यात आली आहेत. परंतु या ठिकाणी शेजारीच पुण्यश्लोक अहल्यादेवी दशक्रीया घाट आहे. त्यामुळे मृत्यूनंतर मनुष्य कैलासवासी होतो व कैलासवासात भगवान शंकरांचे वास्तव्य असते, या अनुषंगाने हा पुतळा बसविला आहे. त्यामुळे एरवी सुसाट कसेही सुटणारे वाहण चालक देवांचे देव शंकरमहादेव यांना पाहुन वाहनाचा वेग मंदावतात व मनोभावे त्यांचे स्मरण करतात.

Web Title: Marathi news pune news mahashivratri