महात्मा गांधींना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

रमेश मोरे
मंगळवार, 30 जानेवारी 2018

जुनी सांगवी (पुणे) : सांगवी परिसरातील सामाजिक संस्था, कार्यकर्त्यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
 काँग्रेस आय दापोडी विभागाच्या वतीने राजु वाळुंजकर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी तानाजी काटे, चंद्रकांत काटे, भाऊसाहेब मुगूटमल, संदेश नवले, राजु काची, नरेंद्र बनसोडे, देवेंद्र सिंग यादव, सदानंद साबळे, आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दापोडी विभाग यांच्या वतीने शेखर काटे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सुनिल तोरणे, विवेक विधाते, श्रीकांत काटे, सागर काटे, अमोल काटे आदी उपस्थित होते. जुनी सांगवी येथील राहीमाई प्रतिष्ठानच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त मनोहर ढोरे व सामाजिक कार्यकर्ते शिवलिंग किनगे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी अंध मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी दत्तात्रय भोसले, जवाहर ढोरे, रविंद्र बाईत, भूषण शिंदे, शामराव ढमाले, महेश कावळे, शिवाजी मंडलिक आदी उपस्थित होते. महात्मा गांधी यांचे अहिंसा तत्वाचे विचार तरूणांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. तरूणांनी कोणत्याही प्रकारची व्यसने न करता आपले शरीर निरोगी व मन प्रसन्न ठेवावे. असे मनोहर ढोरे यांनी बोलताना व्यक्त केले.

Web Title: Marathi news pune news mahatma gandhi death anniversary